Mahayuti News : मोठी बातमी ! 'महायुती'त आणखी एका पक्षाची एन्ट्री; भाजपला किती फायदा होणार ?

Mahayuti Maharashtra Politics : भाजप महायुतीच्या माध्यमातून घटक पक्षांना सोबत घेऊन रणनीती आखत असून, आता महाराष्ट्र क्रांती सेनेने महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच 'इंडिया' आघाडी आणि 'एनडीए'ने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे 'इंडिया' आघाडीने विरोधी पक्षांना बरोबर घेत आघाडी स्थापन केली आहे. राज्यात महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. दुसरीकडे भाजप महायुतीच्या माध्यमातून घटक पक्षांना सोबत घेऊन रणनीती आखत आहे. आता महाराष्ट्र क्रांती सेनेनेदेखील महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. (Mahayuti Maharashtra Politics)

महाराष्ट्र क्रांती सेनेमुळे 'एनडीए'त सहभागी असणाऱ्या पक्षांमध्ये आणखी एका पक्षाची भर पडली असून, याचा भाजपला निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली असल्याची माहिती महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. राज्यातील मराठा समाजासह वंचित घटकांच्या प्रश्नांवर कार्य करणारी महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाल्याचं प्रसाद लाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahayuti News
Reservation News : IAS, IPS अधिकारी आरक्षणाचा त्याग करणार का? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवईंनी चर्चेला तोंड फोडलं

आमदार लाड यांनी पत्रकात काय म्हटलं ?

"आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रांती सेना ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून कार्य करणार आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेच्या सहभागामुळे महायुतीला अधिक बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सहमतीने महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे", असं पत्रकात सांगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत असून, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा 'महाविजय 2024' हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतील, असंही लाड यांनी म्हटलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahayuti News
Yashomati Thakur : 'म्हातारपणी बापाला लाथ का मारावीशी वाटली?' निवडणूक आयोगाच्या निकालानंतर यशोमती ठाकूर बरसल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com