KDMC News : खड्डे बुजविण्याचे कामाची उपमहापौरांनीच केली पोलखोल! पाहणीत धक्कादायक वास्तव समोर! अधिकाऱ्यांनाही सूचना

Rahul Damle BJP Shivsena : कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत दामले यांनी शहर अभियंता यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
Rahul Damle
Rahul Damlesarkarnama
Published on
Updated on

KDMC News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या काळात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांमार्फत सुरू करण्यात येत आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतरही काही ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याची बाब खुद्द उपमहापौर राहूल दामले यांनी उघडकीस आणली आहे.

डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर परिसरातील पारसमणी चौकातून जात असताना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेला खडीचा भराव उपमहापौर राहुल दामले यांच्या निदर्शनास आला. या कामाची पाहणी केल्यानंतर खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकण्यात आली असून डांबराचा वापर नीटसा झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले.

कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत दामले यांनी शहर अभियंता यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कामासाठी वापरण्यात आलेल्या खडीच्या भरावाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून काम नियमानुसार झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.

Rahul Damle
BJP MNS Clash : "नादी लागू नका...", राजू पाटलांचा भाजप जिल्हाध्यक्षाला इशारा; रवींद्र चव्हाणांनाही सल्ला

...तो पर्यंत बील काढू नका

“एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि आयुक्त कामाचे नियोजन करतात; मात्र कंत्राटदारानेही दर्जेदार काम करणे अपेक्षित आहे. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका दामले यांनी घेतली. तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे बिल काढू नये, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असताना कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनीही अशा कामांवर लक्ष ठेवून प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन दामले यांनी केले आहे.

Rahul Damle
Shiv Sena vs BJP : पुण्यात ठिणगी, कल्याण फाट्यावर धुराळा; शिवसेना-भाजपच्या वादाला नवा ट्विस्ट, एकाच कामाचे दोनदा उद्घाटन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com