Bangalore News: ‘ऑपरेशन लोट्स’च्या माध्यमातून कर्नाटकात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार, असा दावा काही दिवसांपूर्वी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला होता.
दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पुन्हा तोच दावा कुमारस्वामींनी केला आहे. कर्नाटकातही एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पडणार, असा दावा त्यांनी केला आहे. (Kumaraswami again claims 'Operation Lots' in Karnataka after Modi visit)
कर्नाटकात दुसऱ्या ‘ऑपरेशन लोट्स’ची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, अशी चर्चा दोन-तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्याला काँग्रेस नेत्यांकडूनही दुजोरा मिळत आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तशी कबुली दिली होती.
भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 50 आमदार भाजप हायकमांडच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कर्नाटकात जबरदस्त खळबळ उडाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कुमारस्वामी यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर येणार, असे म्हटले होते. दिल्लीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर पुन्हा तोच दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.
कर्नाटकाच्या राजकारणातही एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचे सरकार पडू शकते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर अनेक ठिकाणी नवखे लोक मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकते, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा निराणी यांनी करून काँग्रेसचे किमान ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.
त्या पक्षात अंतर्गत गटबाजी अगोदरच मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, मंत्रिपद न मिळालेले अनेक आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील सिद्धरामय्या यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावाही या नेत्याने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.