Dombivli News: दरेकरांनी फार्म भरल्यानंतर काही तासातच शिंदेंनी केला ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम

Kalyan Lok Sabha Constituency 2024: विकास कामामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे खामकर यांनी सांगितले. आपल्या कामाची किंमत होते, त्याठिकाणी मी आलो आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Dombivli News
Dombivli NewsSarkarnama

Kalyan News: कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे डोंबिवलीमध्ये आले होते, दरेकरांचा (Vaishali Darekar) अर्ज भरण्याला काही तास उलटताच कल्याण लोकसभेचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. डोंबिवली ठाकरे शिवसेना प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Kalyan Lok Sabha Constituency 2024) ठाकरे गटात हे खिंडार पडले आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे बोलले जाते. ठाकरे गटाचे (Thackeray Group) डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड, कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Dombivli News
Maharashtra Politics: भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा! महाराष्ट्रात 15 वर्षांत 8 साधू-महंतांनी लढवली निवडणूक

अंबरनाथ काँग्रेस जिल्हाअध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे.त्यानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे अंबरनाथमधील काँग्रेस, आणि डोंबिवलीमधील ठाकरे गट भुईसपाट झाले असल्याची चर्चा आहे.

गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत शिवसेनेने केलेल्या विकास कामामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे खामकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माध्यमांनी सांगितले. ज्या ठिकाणी आपल्या कामाची किंमत होते, त्याठिकाणी मी आलो आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

खामकर, गावंड यांच्यासह या पदाधिकारी घेतला शिवसेनेत प्रवेश

युवासेना उपशहर अधिकारी आयुष गावंड, उपविभाग अधिकारी तेजस वैद्य, साहिल कुडपाने, साहिल परब, प्रकाश भालेराव, सागर कसबे, युवती जिल्हा अधिकारी लीना शिर्के, विधानसभा संघटक राधिका गुप्ते, शहर संघटक किरण मोंडकर,माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण, उपशहरप्रमुख राजेंद्र नांदोस्कर, कृष्णा आव्हाड, महिला उपशहर संघटक नंदा सावंत, शिल्पा मोरे, ममता घाडीगावकर, अल्पा चव्हाण, सीमा अय्यर, विद्या देसाई, विभाग प्रमुख श्याम चौगुले, सुधीर पवार, शिवराम हळदणकर, महिला विभाग संघटक मानसी गावडे, प्रतिभा पांचाळ उपविभाग प्रमुख गोरक्ष खोकराळे, नरेंद्र खाडे, सतीश कुलकर्णी, प्रशांत शिंदे, महिला उपविभाग संघटक स्मिता मोहिते, अपर्णा खेडेकर, सोनल कदम, रसिका तांडेल, अनिता पडवळ, भावना पेडणेकर, सविता नलावडे, लीना तेंडुलकर, शामल आचरेकर आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com