Kalyan Lok Sabha Exit Poll 2024 : श्रीकांत शिंदेंचंच 'कल्याण', ठाकरेंची मशाल पेटणारच नाही!

Shrikant Shinde Vs Vaishali Darekar Thane Lok Sabha Exit Poll 2024: ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मोठा उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा वरूण सरदेसाई येथून लढतील असा देखील अंदाज वर्तवण्यात येत होते.
Shrikant Shinde
Shrikant Shindesarkarnama

Kalyan Lok Sabha : शिंदे-फडणवीस सरकारमधील 'पॉवर स्टेशन' म्हणजे, डॉ. श्रीकांत शिंदेंना बालेकिल्ल्यातच घेरण्याची नीती आखून ठाकरेंनी महिला कार्ड काढले आणि वैशाली दरेकरांकडे कल्याणची सुभेदारी सोपवली. मात्र, ठाकरेंनी किती आणि काहीही गनिमा कावा केला तरीही; आपल्या गडाची एक दगडी हलणार नाही, यासाठी डॉ. श्रीकांत यांनीही तटबंदी केली. अर्थात, डॉ. श्रीकांत हे कल्याणमधून तिसऱ्यांदा दिल्लीत नेतृत्व करणार असल्याचे संकेत 'एक्झिट पोल'ने दिले आहेत. म्हणजे, ठाकरेंवर कल्याणमध्ये पराभवाची नामुष्की ओढवणार आहे.

टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना येथे मोठा धक्का बसत असल्याचा पोलचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे म्हणूनच या लढतीकडे पाहिले जात होते.

ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या विरोधात मोठा उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा वरूण सरदेसाई येथून लढतील असा देखील अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र, हे अंदाज चुकीचे ठरत ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर Vaishali Darekar यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरेकरांची उमेदवारी जाहीर होताच. शिंदे गटाकडून ठाकरेंचे कल्याण मधील पदाधिकारी फोडले. ठाकरेंचे मित्र पक्ष काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील शिंदेंनी आपल्या पक्षात घेतले. शिवाय श्रीकांत शिंदेंच्या मदतीला मनसे धावून आली.मनेसेचे आमदार राजू पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून श्रीकांत शिंदेचा प्रचार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com