Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Loksabha Election : रमेश जाधव यांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. मात्र, आपणच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे उमेदवार मीच असणार, असे वैशाली दरेकर यांनी ठामपणे सांगितले आहे.
Ramesh Jadav Vaishali Darekar
Ramesh Jadav Vaishali Darekarsarkarnama

Kalyan Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकर या रिंगणात आहेत. मात्र, या जागेवर नवीन ट्विस्ट आला असून माजी महापौर रमेश जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सकाळी फोन करून आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्या दावा रमेश जाधव यांनी केला आहे.

Ramesh Jadav Vaishali Darekar
Thane Loksabha News : खरी शिवसेना आपलीच; त्यांच्याकडे विरघळून जाणारे 'आईस्क्रिम' : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

ठाकरे गटाकडून Thackeray Group वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश जाधव यांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. मात्र, आपणच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे उमेदवार मीच असणार, असे वैशाली दरेकर Vaishali Darekar-Rane यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे वैशाली दरेकर,रमेश जाधव यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे कोण घेणार याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकर यांचे नाव पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. मंगळवारी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले. दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यामुळे विविध घटक पक्षातील उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होती.

त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश म्हात्रे हे निवडणूक कार्यालयात आले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे हेदेखील हजर झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू झाली. ठाकरे गटातील माजी महापौर रमेश जाधव हे अर्ज भरून बाहेर येताच त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे सांगितले.

वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या श्रीकांत शिंदेंच्या विरोधात चांगली लढत देतील, अशी चर्चा होती. मात्र दरेकरांना उमेदवारी दिल्याने जुने शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीतील काँग्रेस पदाधिकारी देखील दरेकरांवर नाराज असल्याची चर्चा होती. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू असताना माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाकरे गटाने दरेकर यांना उमेदवार जाहीर केला असताना दुसरा उमेदवार अर्ज कसा भरू शकतो असे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवलेत जातायेत. रमेश जाधव म्हणाले, मला आज सकाळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितले. स्क्रुटनीच्या दिवशी तुम्हाला कळेल काय होतंय ते असे सूचक विधान देखील केले.

(Edited : Roshan More)

Ramesh Jadav Vaishali Darekar
Palghar loksabha News : अर्ज भरताना डॉ. हेमंत सावरांचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह खासदारांची दांडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com