Ambernath Political News: मुख्यमंत्री शिंदे अंबरनाथमध्ये धडकले; बालाजी किणीकरांच्या व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवले

Eknath Shidne News: पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश होता. या सर्वच मतदारसंघातील लढती लक्षवेधी होत्या. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे लढवत असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती.
Balaji Kinikar, Eknath Shidne
Balaji Kinikar, Eknath ShidneSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Visit Ambernath: आज देशभरात लोकसभेसाठी विविध मतदारसंघात मतदान पार पडलं. तर महाराष्ट्रात आज शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आजच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश होता. या सर्वच मतदारसंघातील लढती लक्षवेधी होत्या. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे लढवत असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. तर या मतदारसंघातील अंबरनाथ शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक भेट देत सुपरफास्ट दौरा केला आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Voting Phase 5) कल्याण लोकसभेसाठी मतदान पार पडलं. या मतदारसंघातील अंबरनाथ शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक पाच वाजता आले आणि त्यांनी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या अंतिम तासात मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह अंबरनाथ शहरात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) उभारण्यात आलेल्या बूथवर बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांनी अचानक कार्यकर्त्यांच्या समोर येऊन आपली गाडी उभी केल्यामुळे कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले, मुख्यमंत्र्यांनी एका तासात संपूर्ण अंबरनाथ शहराला आपलं दर्शन घडवले. दहा ते पंधरा गाड्यांचा ताफा आणि पहिल्या गाडीत मुख्यमंत्री हे पाहून शहरातील गल्ली बोळातील नागरिक आश्चर्यचकित झाले होते.

अंबरनाथमधील (Ambernath) शिंदेसेनेची संपूर्ण धुरा आमदार बालाजी किणीकरांच्या (Balaji Kinikar) खांद्यावर असते. किणीकर हे शिंदेंचे जवळचे आमदार मानले जातात. शिंदेंच्या बंडाचा प्लान त्यांना पहिल्यापासून ठाऊक होता, तर ते बंडाच्या पहिल्या दिवसापासून शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी किणीकरांच्या कार्यक्षेत्रात येऊन त्यांच्या व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवल्याचं पाहायला मिळालं.

Balaji Kinikar, Eknath Shidne
Chandrashekhar Bawankule Letter : मतदान संपताच बावनकुळेंनी बडवला विजयाचा ढोल; BJP कार्यकर्त्यांसाठी पत्र; म्हणाले...'

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या मतदारसंघात अंदाचे 41.70 टक्के मतदान झालं. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com