Kalyan Hospital girl assault
The assaulted receptionist from Kalyan is under treatment at Janaki Hospital. Doctors warn of possible paralysis due to serious injuries caused by Gokul JhaSarkarnama

Kalyan Receptionist Assault Case : रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; नेमकं काय घडलं?

Kalyan Receptionist Assault Case : क्लिनिकमधील नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, त्यामध्ये हा खुलासा झाला आहे.
Published on

Kalyan Receptionist Assault Case : कल्याण इथं एका क्लिनिकमधील रिसेप्शनिस्टला मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. आधी रिसेप्शनिस्टनंच मारहाण केल्यानं संतापलेल्या तरुणानं तिला लाथा-बुक्यांनी मारल्याचं समोर आलं आहे. क्लिनिकमधील नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, त्यामध्ये हा खुलासा झाला आहे.

Kalyan Hospital girl assault
Sangli Crime : 'डॉक्टर' व्हायचं होतं तिला… पण सराव चाचणीनं केला घोळ! चिडलेल्या बापाची अमानुष मारहाण; 17 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

नेमकं काय घडलं?

नांदिवली येथील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या 'श्री बालचिकित्सालय क्लिनिक'मध्ये रविवारी रिस्पेशनिस्ट सोनाली कळासरे (वय २५) या तरुणीला गोकूळ झा नामक परप्रांतिय तरुणानं लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. आपला लहान मुलगा आजारी असल्यानं त्याल डॉक्टरांना दाखवण्यासाठी झा कुटुंबातील पती-पत्नी या क्लिनिकमध्ये आले होते. डॉक्टर क्लिनिकमध्ये अर्धा तास उशीरानं आले आणि आल्या आल्या त्यांनी काही एमआर लोकांना केबिनमध्ये बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा करत होते.

पण बाहेर पाच ते सहा पेशन्ट डॉक्टरांसाठी ताटकळत बसले होते. यावेळी झा पती-पत्नी आणि त्यांचं बाळ यांच्यासह त्यांचा भाऊ गोकूळ झा हा देखील क्लिनिकमध्ये आला होता. या कुटुंबानं आम्हाला डॉक्टरला लवकर भेटायचं आहे आम्हाला आतमध्ये पाठवा अशी विनंती रिसेप्शनिस्टला केली होती. पण आतमध्ये आधीच एमआर लोक बसलेले असल्यानं ते आल्यानंतर सोडण्यात येईल असं तिनं या कुटुंबाला सांगितलं. पण वेळ लागत असल्यानं या कुटुंबाची आणि रिसेप्शनिस्टची शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली.

Kalyan Hospital girl assault
Sangli Crime : 'डॉक्टर' व्हायचं होतं तिला… पण सराव चाचणीनं केला घोळ! चिडलेल्या बापाची अमानुष मारहाण; 17 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीनं थेट गोकूळ झा याच्या वहिनीच्या कानाखाली मारली. त्यामुळं आधीच्या शाब्दिक बाचाबाचीनंतर गोकूळ झा हा क्लिनिकबाहेर निघून गेलेला होता तो संतापला आणि परत क्लिनिकमध्ये आला आणि त्यानं थेट रिसेप्शनिस्ट तरुणीच्या पोटात लाथ मारत नंतर तिला हातानंही मारहाण केली. याप्रकरणामुळं क्लिनिकमध्ये अचानक मारहाणीचा प्रकार घडल्यानं सर्वचजण गोंधळून गेले. गोकूळ झाला त्याच्या भाऊ आणि वहिणीनं तसंच इतर पेशन्टच्या नातेवाईकांनी आवरण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बाहेर घेऊन गेले. पण अचानक आणि जोरदार हल्ला झाल्यानं रिसेप्शनिस्ट तरुणी मात्र घाबरुन गेली होती.

Kalyan Hospital girl assault
Daund firing News : दौंडच्या कला केंद्रात गोळीबार : आवडीच्या लावणीवरून 2 गटात राडा, सत्ताधारी आमदाराशी संबंधित व्यक्तीचा समावेश?

रिसेप्शनिस्ट तरुणीनं आधी हाच उचलला

या प्रकारावर सुरुवातीला मराठी-अमराठी हा वाद निर्माण केला गेला. त्यावर मनसेच्या अविनाश जाधवांनी पीडित तरुणीची भेटही घेतली होती. तसंच या परप्रांतीय तरुणाला उत्तर दिलं जाईल असंही सांगितलं होतं. पण आता या घटनेच्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमधून संबंधित तरुणीनंच आधी तिला मारहाण करणाऱ्या तरुणाच्या वहिनीच्या कानशिलात लगावल्यानं तो चिडला आणि त्यानं तिच्यावर हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, काल पोलिसांनी गोकूळ झा याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर मारहाणी प्रकरणी एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलीस याचा अधिक तपासही करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com