Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मंथनासाठी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडियाच्या घटक पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत २८ पक्षांचे ६३ व्हीआयपी नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचं फोटोसेशन सुरु असताना अचानक वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी सिब्बल हे काँग्रेसमधून बाहेर पडले. मात्र आता इंडिया आघाडीच्या बैठकीत ते अचानकपणे आल्याने सर्वजण चकीत झाले. सिब्बल यांच्या उपस्थितीबद्दल काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Kapil Sibal Attends India Leaders Photo Session; Displeasure of Congress leaders)
मुंबईतील ग्रँड हयातमध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्रित आले असून सर्वांची बैठक सुरु आहे. या दोन दिवसीय बैठकीसाठी २८ पक्षांचे नेते मुंबईत जमले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव, अखिलेश यादव हे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचं फोटोसेशन सुरु होते. त्यावेळी अचानक वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल हे काँग्रसमधून बाहेर पडले असून त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, आता इंडियाच्या बैठकीत ते अचानकपणे आल्याने सर्वचजण चकीत झाले आहेत. त्यांच्या फोटोसेशनमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.
काँग्रेस सिब्बलांवर नाराज का?
काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले हेाते. मात्र, ते पत्र माध्यमांमध्ये लिक झाले होते. त्यात राहुल गांधी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस अध्यक्षांची निवड कशी करावी, नवे नेतृत्व कसे असावे, असे प्रश्न उपस्थित केले होते. ते पत्र लिहिणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होतो. तसेच, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, मनीष तिवारी सिब्बल यांच्यासह २३ नेत्यांचा समावेश होता. त्या नाराज गटाला जी-२३ या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर सिब्बल आणि राहुल गांधी यांच्यात जाहीररित्या जुगलबंदी रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.