KDMC Election Voting : शाई पुसली जातेय; बोगस मतदानाचा धोका, मनसेच्या उमेदवार प्रचंड आक्रमक

KDMC MNS Urmila Tambe : मतदान करताना लावची जाणारी बोटाची शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये हा प्रकार समोर आल्याने मनसे उमेदवार प्रचंड आक्रमक झाल्या.
MNS leader Urmila Tambe protests in Kalyan–Dombivli over alleged erasure of voting ink during polling.
MNS leader Urmila Tambe protests in Kalyan–Dombivli over alleged erasure of voting ink during polling.sarkarnama
Published on
Updated on

KDMC Election : महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, मतदान करताना मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी या विषयी तक्रार केली आहे.

कल्याण डोंबिवलीमधील पॅनल क्रमांक नऊ मध्ये मतदान करताना बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी या संदर्भात तक्रार केली.

हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? असा संतप्त सवाल तांबे यांनी विचारलाय. दरम्यान, शाई पुसली जात असल्याने दुबार मतदानाचा धोका कायम असून उर्मिला तांबे यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.

MNS leader Urmila Tambe protests in Kalyan–Dombivli over alleged erasure of voting ink during polling.
Nashik NMC Election : नाशिक पोलिस आयुक्तांचे चोख नियोजन, 'काही अनुचित घडलं तर अवघ्या 'पाच' मिनिटांत पोहोचणार फोर्स

शाई पुसले मतदाराला चोपले

पुणे शहरातील धायरी भागात एका मतदाराने मतदान झाल्यानंतर एका लिक्विडने आपल्या बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ते लिक्विड जप्त करत चोप दिला. तसेच याबाबत ते पोलिसाकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश पोकळे यांनी दिली.

MNS leader Urmila Tambe protests in Kalyan–Dombivli over alleged erasure of voting ink during polling.
PMC Nivadnuk: मतदानाची शाई पुसण्याचा प्रयत्न; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप; पुण्यात काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com