मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे सध्या तुरूंगात आहे. तिने सोमवारी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जामीन देऊ नका, अशी याचिका न्यायालयात केली आहे. त्यानंतर आता तिने मंगळवारी पुन्हा एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)
केतकीवर राज्यभरात जवळपास 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मागील 23 दिवसांपासून ती तुरूंगात असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी केतकीने वकील हरेकृष्ण मिश्रा यांच्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Ketaki Chitale moves Bombay HC seeking quashing of FIRs)
तिने आपल्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि आपली अटक बेकायदेशीर असून आपल्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असंही तिनं याचिकेत म्हटलं आहे.
कळवा पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्याला झालेले नुकसानाची भरपाई देण्याची मागणीही केतकीने केली आहे. या गुन्हाचा तपास थांबवून राज्यभरात ठिकठिकाणी झालेले गुन्हे कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करावेत. हे एकच प्रकरण असल्याने अन्यत्र दाखल गुन्हायात अटक करू नये, अशी याचिका तिने केली आहे.
जामीन मिळाल्यास देशमुख पळून जातील
अनिल देशमुख व नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. पण केतकीने देशमुखांना जामीन देण्यास विरोध करणारी याचिका केली आहे. त्यांना जामीन मिळाल्यास ते पळून जातील, असा दावा तिने याचिकेत केला आहे.
राज्यपालांकडे घेतली धाव
केतकीच्या वकिलांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केतकीला गंभीर गुन्ह्यातील आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात आहे. तिच्यावर 22 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना हल्ला करणे, हल्लेखोर महिलेने केलेल्या योजनेची माध्यमांना माहिती देणे, हे सगळे नियोजनबध्द होते, असा दावा वकील योगेश देशपांडे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.