शिवसेनेचे दोन 'संजय' राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज; 'मविआ'चे एकीचे दर्शन अन् शक्तीप्रदर्शन

Shivsena | Rajysabha : मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार अन् बाळासाहेब थोरातांची उपस्थिती
Sanjay Raut, Sanjay Pawar
Sanjay Raut, Sanjay Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) या दोघांनीही आज (गुरुवारी) राज्यसभा (Rajya sabha) निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात दुपारी १ च्या सुमारास मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav-Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या अन्य मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये एकीचे दर्शन अन् शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. (Rajysabha Election latest news)

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा केला. तसेच भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी फरक पडणार नाही असेही राऊत म्हणाले. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहे, मला खात्री आहे मी विजयी होईन असं म्हणतं संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसैनिक राज्यसभेवर जाणार त्यामुळे मी खूप खूश आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याची पवार यांनी सांगितले.

Sanjay Raut, Sanjay Pawar
Aurangabad : नगरसेवका इतकीही किंमत नसलेले चंद्रकांत पाटील चर्चेत राहण्यासाठी बरळतात..

एकीकडे शिवसेनेचे उमेदवार आज अर्ज दाखल करत असतानाच तिकडे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे. महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, यांच्यानंतर ईडीने महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असलेले अनिल परब यांच्यावर छापेमारी केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला असून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी दिली आहे.

Sanjay Raut, Sanjay Pawar
संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभेच्या रिंगणातून माघार; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नामुष्की

संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभेच्या रिंगणातून माघार

दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ते उद्या (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेवून याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही अपक्ष आमदार महेश बालदी आणि मनसे वगळता अन्य भाजप (BJP), महाविकास आघाडी किंवा इतर अपक्ष आमदार यांच्यापैकी कोणीही संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. याशिवाय राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. (Sambhajiraje Chhtrapati latest News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com