Kirit Somaiyya News : किरीट सोमय्या भाजपवर नाराज? चक्क पक्षाचा 'आदेश' धुडकावला; बावनकुळेंसह दानवेंनाही पत्र

BJP Politics : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं होतं.
Kirit Somaiyya
Kirit Somaiyya Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना 2019 साली शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने तिकीट नाकारले होते.तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले. त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारले अन् मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे.

अशातच भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांची निवडणूक व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करत मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेत सोमय्या पुन्हा एकदा विरोधकांची धडकी भरवणार असल्याचे बोलले जात होते. पण सोमय्यांनी भाजपने दिलेली जबाबदारी नाकारली आहे. त्यांनी थेट विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलं आहे.

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी दानवे आणि बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात आपण 2019 पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे विनम्रपूर्वक ही जबाबदारी नाकारतो. मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सोमय्या पत्रात काय म्हणाले..?

किरीट सोमय्या पत्रात म्हणतात,प्रिय बावनकुळेजी, मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो.गेली साडेपाच (5 1/2) वर्ष,म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून,मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे.मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे असंही ते म्हणाले.

सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. तीनवेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले ही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही.सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार आहे असंही सोमय्या पत्रात म्हटलं आहे.

Kirit Somaiyya
BMC Clerk Recruitment : आदित्य ठाकरेंच्या आंदोलनाला मोठं यश; 'बीएमसी' एक पाऊल मागे, लिपिक भरतीसाठीची 'ती' अट अखेर रद्द

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.

या समितीत विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे,आशिष शेलार,नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Kirit Somaiyya
Amol Kolhe On NCP Ajit Pawar: खासदार कोल्हेंची अजित पवार गटाला झोंबणारी टीका; म्हणाले, सध्या त्यांची अवस्था...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com