MVA News : किशोरी पेडणेकरांचा मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल; म्हणाल्या, 'तुम्हाला शेंदूर लावला नसता तर अल्पच...'

Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Hasan Mushrif, Samarjit GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता मुंबईतील कागल येथील नागरिकांच्या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला.

मुंबईत कागल मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. या सर्व कागलकराना एकत्रित आणत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) टीका करताना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, 'आता त्यांना आठवतंय मी अल्पसंख्यांक आहे. अरे पवार साहेबांनी तुम्हाला शेंदूर लावला नसता तर अल्पच राहिला असतात, संख्या आमच्याकडे असती, अशा शब्दांत त्यानी टीका केली.

महाविकास आघाडीचे राज्य म्हणजे गद्दारांना घरी बसवणे आणि खुद्दारांना सत्तेत बसवणे. ज्या वेळेला सत्ता होती तेव्हा कशी कामे अडवली जात होती, असे म्हणत पेडणेकर यांनी मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल केला.

समरजित घाटगे यांचा विजय 100 टक्के झाला समजा. एकदा जनतेने आशीर्वाद दिला तर त्याला थांबवायच्या ताकद कुणाकडे नाही. जेव्हा कोल्हापूरमध्ये महापूर आला. त्यावेळी रेशनचे किट वाटप करण्यासाठी कोल्हापूरमध्ये गेलो होतो. कोल्हापूरमधले मुंबईत राहणाऱ्यांचे कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले. मुंबईमध्ये शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. काही करा यंदा कागलमध्ये हत्तीला गाढायचा म्हणजे गाढायचा आहे. भ्रष्टाचार करता करता आणि केसेस होता होता भाजप सोबत गेला, अशी टीकाही यावेळी शिवसेना नेते अजय चौधरी यांनी केली.

Hasan Mushrif, Samarjit Ghatge
MVA News : लातूर जिल्ह्यात जागावाटपावरून 'माविआ'त ठिणगी; ठाकरे गटाने केला 'या' तीन जागेवर दावा

राजे मुळात तुमचा पत्ता आधी चुकला होता आता तुमचा पत्ता परफेक्ट लागला आहे. अडचणीच्या काळात तुम्ही पवार साहेबांच्या सोबत उभे राहण्याचे काम केले. नक्कीच हा मतदार तुमच्यामागे उभा राहिल्या शिवाय राहणार नाही. ही तुमच्या विजयाची सभा ठरणार असल्याचे ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांनी स्पष्ट केले.

कागलमधून परिवर्तन करणार

आगामी काळात कागल मतदारसंघातून परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. काही जण माझ्यावर टीका करतात त्या लोकांना टिकेमध्ये गुंतवून ठेवायचा आहे. या लोकांना उत्तर द्यायचं असेल तर विकासाच्या मॉडेलवरच उत्तर द्यायचे. मतदारसंघात असे काम करायचे की मुंबईतील लोकांना तिथे संधी मिळाली पाहिजे, असेही यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले.

Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Mahayuti News : उत्तर महाराष्ट्रासाठी महायुतीने आखली रणनीती; 'या' 16 मतदारसंघावर असणार विशेष लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com