Torres Scam : मुंबईच नव्हे तर 'टोरेस'कडून कोल्हापूरकरांचीही फसवणूक; 'त्या' महिलेने स्वत:चे 10 हजार गुंतवले अन् 86 जणांनाही अडकवलं

Torres Scam Kolhapur Connection : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील इतर शहरातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे आता कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आता या कंपनीचे फसवणूक जाळे राज्यभरात पसरल्याचं हळूहळू समोर येत आहे.
Torres Scam
Torres ScamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 Jan : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील इतर शहरातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे (Torres Scam) आता कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आता या कंपनीचे फसवणूक जाळे राज्यभरात पसरल्याचं हळूहळू समोर येत आहे.

कारण टोरेसने फसवणूक केल्याची बातमी समोर येताच कोल्हापूरमधील (Kolhapur) 86 गुंतवणूकदारांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील एका महिला एजंटने टोरेसच्या ऑफरमध्ये 10 हजार रुपये गुंतवले होते. शिवाय तिने तिचे नातेवाइक आणि मित्रांनाही या योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडलं.

तिचं ऐकून एकूण 86 जणांनी या योजनेत पैसे गुंतवल्याचं समोर आलं आहे. याच फसवणूक झालेल्या गुंतवणुकदार कोल्हापूरकरांनी मागील 3 दिवसांपासून शिवाजी पार्क पोलिस स्टेशनबाहेर तळ ठोकला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध शहरातील लोक हळूहळू तक्रारी घेऊन येत असल्यामुळे टोरेसचे जाळे राज्यभरात पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

तर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईसह ठाण्यात सर्च ऑपरेशन सुरू असून त्यांनी कंपनीतील ऑफिसमधील्या रकमेसह कागदपत्रे, लॅपटॉप जप्त करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी (ता.09) सकाळपासून मुंबईतील टोरेसच्या कार्यालयासह आरोपींच्या कुलाबा आणि डोंबिवलीतील घरांतही शोध मोहीम राबवली आहे.

Torres Scam
Sushma Andhare : पुण्यातील ‘त्या’ खून प्रकरणावरून अंधारेंनी केली चाकणकरांवर टीका; म्हणाल्या, महिला आयोगावर...

पोलिसांनी टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कसातोवा आणि स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार यांच्याही घरांची झडती घेतली. यावेळी तानियाच्या घरातून काही रक्कम जप्त केली आहे. आतापर्यंत टोरेस कंपनीविरोधात दोनशेच्या वर गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

घोटाळा नेमका कसा झाला?

टोरेस ज्वेलर्स कंपनीने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परताव्याची योजना सुरू केली होती. कंपनीने दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा ओपन केल्या होत्या. सर्वच ठिकाणी लाखो लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. काही महिने सुरूवातीला 4 टक्के आणि नंतर 10 टक्के परतावा देण्यात आला.

Torres Scam
Walmik Karad : "वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणून...", लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाबाबत बावनकुळेंनी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

मात्र, त्यानंतर मागील दोन आठवडे परताना न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला आणि त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता फसणुकीचा प्रकार समोर आला. या कंपनीने आतापर्यंत घर, वाहने आणि अन्य महागड्या वस्तू बक्षीस म्हणून जाहीर केल्या होत्या. त्याबाबतची कागदपत्रेही सापडली आहेत. या कागदपत्रांवरून कंपनीने आतापर्यंत 15 वाहने बक्षीस म्हणून वाटली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com