Walmik Karad : "वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणून...", लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाबाबत बावनकुळेंनी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

Chandrashekhar Bawankule On Walmik Karad : मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असलेला वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीडके कराडवर विविध 14 गुन्हे दाखल असतानाही तो परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Chandrashekhar Bawankule On Walmik Karad
Chandrashekhar Bawankule On Walmik Karad Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. या हत्येचा सर्वच स्तरावरून तीव्र निषेध केला जात आहे. एकीकडे या प्रकरणात अनेक पोलिसांसह राजकीय नेत्यांचा सहभाग होत आहे.

एकीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जवळचा असलेला वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीडके कराडवर विविध 14 गुन्हे दाखल असतानाही तो परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

तर हे प्रकरण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चांगलंच लावून धरलं आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसं केलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सुळेंच्या याच प्रश्नाला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule On Walmik Karad
Ajit Pawar PC : पुणे पोलिसांना अजितदादांनी जाहीररित्या फटकारले; ‘तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा...’

"वाल्मिक कराडने (Walmik Karad) चांगलं काम केलं म्हणूनच त्याला लाडकी बहीण योजनेचं अध्यक्ष पद दिलं असेल", असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, "बीडमधील हत्या प्रकरणात प्रकरणात सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार कारवाई करत आहे. अनेक जणांच्या चौकशी लावल्या आहेत.

या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः लक्ष घालून आहेत. शेवटपर्यंत लक्ष देतील आणि आरोपींना शिक्षा भेटेल." दरम्यान, यावेळी त्यांना परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे, यावर विरोधक टीका करत आहेत, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला लाडकी बहीण योजनेचंअध्यक्ष पद दिलं असेल. परंतु, जर चुकीचं काम केलं असेल तर शिक्षाही होईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Chandrashekhar Bawankule On Walmik Karad
Top Ten News : उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे फडणवीसांशी जवळीक साधताय? ; बीडबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

तर यावेळी त्यांनी मावळ विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके विरोधात प्रचार करणारे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर आमची शिस्तभंग समिती योग्य निर्णय घेईल, असं सांगितलं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केल्याचंही बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com