Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे टेन्शन वाढवारी एक बातमी समोर आली आहे. ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर मालमत्ता जमावल्याचा आरोप एका वकील महिलेने केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
न्यायालायत याचिका दाखल करणाऱ्या महिला वकिलाचे नाव गौरी भिडे असे आहे. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल काही आरोप केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केल्याचा गंभीर आरोप, भिडे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
यापुर्वी आपण यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. माझ्याकडे त्यांच्या भ्रष्टाचार व मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे आहे. या याचिकेमागे कसलेही राजकारण नाही, असेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे. या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे हे राज्याचे पर्यावरणमंत्री असताना २०२० ते २०२२ या कालावधीत 'सामना' वृत्तपत्राचा टर्नओव्हर ४२ कोटी रुपये इतका होता. यामध्ये झालेल्या साडेअकरा कोटी रुपयांच्या नफ्यावर गौरी यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय, अशा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणीही भिडे यांनी याचिकेत केली आहे.
दरम्यान, भिडे यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. भिडे यांच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद करण्यासाठी वकीलांनी नकार दिल्यामुळे त्या स्वत:च कोर्टापुढे युक्तिवादासाठी उभ्या राहिल्या.
मात्र, त्यांच्या याचिकेवर न्यायालयीन कार्यालयाने काही आक्षेप नोंदवले. ते दूर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.