Mumbai News : शिवसेनेतल्या अभूतपुर्व फुटीनंतर राज्यात सत्तासंघर्षाचं नाट्य घडून आले. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, हे प्रकरण पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत दिले. शिवसेनेतल्या ठाकरे- शिंदे संघर्ष एकीकडे न्यायालयाच्या दारी सुरू आहे. तर या दोन्ही गटात अनेकदा रस्त्यावरील लढाईसुद्धा घडून आली.
ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये वारंवार राडा घडून आला. अनेकदा रस्त्यावर कार्यकर्ते एकमेकांमा भिडले. कधी घोषणाबाजी करत, कधी शाखांच्या ताब्यावरून दोन्ही गटात जुंपली. आता शिंदे गटाच्या नेत्याकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार नोंदवली गेली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाचे नेते व प्रवक्ते आनंदे दुबे यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. शिंदे गटाच्या नेत्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय म्हशिलकर यांनी आपल्याला धमकी दिली आहे. 'तु्झ्या पक्षाची बाजू मांडणं बंद कर नाहीतर, नाहीतर तुझ्यासह तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.
समतानगर पोलीस स्थानकात (Samatanagar Police Station) ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी व ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dube) यांनी तक्रार नोंदवली आहे. शिंदे गटाचे नेते व सचिवपदी असेलेले संजय म्हशिलकर (Sanjay Mhashilkar) यांना धमकी दिल्याचा दुबे यांचा आरोप आहे. यामुळे ठाकरे-शिंदे गटातील नेत्यांमध्ये यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.