Uddhav Thackeray Bihar tour : नितीशकुमारांच्या मातोश्री भेटीनंतर उद्धव ठाकरे बिहारच्या राजधानीत; विरोधक एकत्र येणार?

Uddhav Thackeray Bihar tour : नितीशकुमार यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली
Uddhav Thackeray Bihar tour :
Uddhav Thackeray Bihar tour : Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Meet With Nitish Kumar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटप आणि मतदारसंघांची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. भाजपकडून लोकसभेसाठी पुन्हा तीनशेपक्षा अधिकचा नारा देण्यात आला आहे, तर विरोधी पक्षांचीही मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सर्व विरोधीपक्षांची एकत्रित येण्यासाठी घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बिहारची राजधानी पाटना येथे विरोधकांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray Bihar tour :
PMC News : खूशखबर ! पुणे पालिकेच्या समाज विकास विभागातील १६० कर्मचारी कायम सेवेत

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीस उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात की, "23 जून रोजी देशातील प्रमुख राजकीय पक्ष बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एकत्र येत आहेत. हे देशभक्त पक्ष आहेत. 2O24 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने ही आशादायी आणि ऐतिहासिक घटना आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.शिवसेना पक्षप्रमुख पाटणा येथील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे. संविधान आणि भारत मातेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Bihar tour :
Mira Road Crime News : क्रूरतेचा कळस! मृतदेहाचे तुकडे-तुकडे फेकून दिले; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये..

नितीश कुमारांची मुंबई दौरा -

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. नितीश कुमार यांचे मातोश्रीवर दाखल होणे, यालाही वेगळे राजकीय महत्त्व आहे. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एकजूट होण्याची ही तयारी आहे, असे नितीशकुमार म्हणाले होते.

Uddhav Thackeray Bihar tour :
Ahmednagar News : राज्यात जातीय, धर्मांध शक्तींचा उच्छाद; आंबेडकरी संघटनांचा राज्य सरकारवर निशाणा

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि यानंतर आता विरोधकांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची पाटण्यात उपस्थिती लावणे, हे विरोधी एकजूट होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com