Anil Parab, Gunratna Sadavarte
Anil Parab, Gunratna Sadavartesarkarnama

'सदावर्तेंनी पैसे गोळा केलेत,' 'याचाही तपास करू'....

गंभीर गुन्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा ST staff सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई Strict Action केली जाईल, असे श्री. परब Anil Parab यांनी सांगितले.

मुंबई : ''एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवून आणला असून सदावर्ते हेच या हल्ल्या मागचे सूत्रधार आहेत, अशी बाजू सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आली आहे. विलिनीकरण करून देतो म्हणून कामगारांकडून पैसे गोळा केलेले आहेत, या पैशाचा कशासाठी वापर केला, हल्ला घडवून आणण्यासाठी याचा वापर झाला काय, याचाही तपास पोलिस करणार आहेत,'' अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितली.

एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी करायच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक होती. तसेच खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत काय निर्णय घ्यायाचा याविषयीही बैठकीत निर्णय झाला आहे, असे सांगून अनिल परब म्हणाले, आता एसटी कामगारांचा संप संपलेला आहे, तसेच कोविडही संपलेला आहे. एसटी पुन्हा सुर करण्यासाठी करायच्या उपाय योजनांचा आम्ही आढावा घेतला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी पवार साहेबाच्या घरावर हल्ला केला होता. याबाबत एसटीचे नियम तपासून बघितले. गंभीर गुन्ह्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री. परब यांनी सांगितले.

Anil Parab, Gunratna Sadavarte
Silver Oak Attack : ॲड. सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर अटक; ‘ही’ लावली कलमे!

ॲड. सदावर्ते यांना पुन्हा एकदा कोठडी मिळाली आहे, याविषयी मंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले गेले, त्यामुळे त्यांनी हल्ला केला. हा हल्ला घडवून आणण्यामागे सदावर्ते हेच सूत्रधार आहेत, अशी बाजू सरकारच्यावतीने मांडली गेली. ते शोधण्यासाठी त्यांना कोठडीत ठेवणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रलोभने दाखवून विविध विषयावर फसवून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात रक्कमा देखील गोळा केल्या आहेत, अशाही तक्रारी आहेत. या तक्रारींचा तपास करणे गरजेचे आहे. पोलिस आपली बाजू मांडत आहेत.

Anil Parab, Gunratna Sadavarte
सदावर्तेंना आता विविध ठिकाणी फिरवणार? ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत

आम्हाला फसवून विलिनीकरण मिळवून देतो, शंभर टक्के मिळवून देणारच असे सांगून पैसे वसुल केल्याचा प्रकार झाला आहे, असे सांगून श्री. परब म्हणाले, पाचशे रूपयांप्रमाणे एक लाख एसटी कामगारांचे पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत. त्याची संख्या कोट्यवधी रूपये होते. हे पैसे कशासाठी वापरलेत, त्याचा पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी उपयोग केला आहे का, हेही तपासात समजणार आहे. सदावर्ते यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. सातारा पोलिसही त्यांना अटक करण्यासाठी आले होते. याविषयी विचारले असता श्री. परब म्हणाले, या सगळ्या प्रकरणाचा तपास होईल.

Anil Parab, Gunratna Sadavarte
अनिल परब आक्रमक : 22 हजार कंत्राटी कामगार भरू पण एसटी सुरू करूच! असे आहे नियोजन

किरीट सोमय्यांची सुनावणी होती, सोमय्या कुठे आहेत याचा शोध घेतला जात आहे का. याविषयी मंत्री परब म्हणाले, ''त्यांनी पैसे गोळा केलेल आहेत. हे पैसे राजभवनात गेलेले नाहीत, असे तेथील सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची चौकशी होणारच. तुम्ही गुन्हेगार नाही तर त्यांनी पोलिसांसमोर यावेत.'' बाप बेटे जेलमध्ये नक्की जाणार असे खासदार संजय राऊत म्हणत आहेत, असे विचारले असता श्री. परब म्हणाले, 'यावर मी काहीही बोलणार नाही, त्याबाबत पोलिस ठरवतील.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com