Sharad Pawar News : 'स्थानिक'साठी शरद पवारांची रणनीती ठरली; भाजपसोबत युतीबाबत काय दिले आदेश?

Sharad Pawar’s NCP Finalizes Local Body Election Strategy : स्थानिक पातळीवर भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जायचं नाही. युती आणि आघाडीचं गणित पाहून निर्णय घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Sharad Pawar addressing NCP leaders during a strategy meeting for upcoming local body elections, emphasizing no alliance with BJP.
Sharad Pawar addressing NCP leaders during a strategy meeting for upcoming local body elections, emphasizing no alliance with BJP.Sarkarnama
Published on
Updated on
  1. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत कोणतीही युती केली जाणार नाही.

  2. स्थानिक पातळीवरील स्वातंत्र्य : स्थानिक पातळीवरील नेत्यांना आघाडी व युतीचे गणित पाहून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, मात्र भाजपसोबत जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

  3. पुण्यातील बैठक आणि रणनीती : मुंबईतील बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिका निवडणुकांची तयारीचा आढावा घेतला.

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपशी युती करण्याबाबत ह्या सूचना करण्यात आल्या आहे. आघाडी आणि युतीचे गणित पाहून स्थानिक पातळीवरील नेत्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. भाजपशी युती टाळण्याचा आदेश कायम आहे.

मुंबईत शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पुणे शहरातील पक्ष संघटना आणि निवडणूक तयारीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.

पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बैठकीतील चर्चेची माहिती देताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाच्या अनागोंदी कारभाराला, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि ढासळत्या प्राथमिक सुविधांना पुणेकर कंटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हा जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष म्हणून आगामी महानगरपालिका निवडणुकीत आघाडीवर राहील, असा विश्वास व्यक्त केला .”

Sharad Pawar addressing NCP leaders during a strategy meeting for upcoming local body elections, emphasizing no alliance with BJP.
BMC Election 2025 : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी 'या' नगरसेवकांचा पत्ता कट करणार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी बैठकीत मोठे विधान करताना स्थानिक नेत्यांना सांगितले की, “युती आणि आघाडीचे गणित पाहून निर्णय घ्या, पण भाजपसोबत जायचे नाही.” यामुळे पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर आघाडीचे स्वातंत्र्य असले तरी भाजपशी कोणत्याही प्रकारची युती न करण्याची भूमिका ठाम राहील.

स्थानिक पातळीवर भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जायचं नाही. युती आणि आघाडीचं गणित पाहून निर्णय घ्या. फक्त भाजप सोबत युती नाही. अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. ही बैठक महाराष्ट्रातील आगामी स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Sharad Pawar addressing NCP leaders during a strategy meeting for upcoming local body elections, emphasizing no alliance with BJP.
BJP office land transfer dispute : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेचा वाद, हस्तांतरणात नियम अन् अटीचा भंग; रोहित पवारांची चौकशी मागणी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: शरद पवार यांनी भाजपसोबत युती का नाकारली?
A: पवार यांनी सांगितले की भाजपची विचारसरणी व कार्यपद्धती राष्ट्रवादी काँग्रेसशी विसंगत आहे.

Q2: स्थानिक पातळीवरील नेत्यांना कोणते अधिकार दिले आहेत?
A: आघाडीचे गणित पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

Q3: पुण्यातील बैठकीत कोण उपस्थित होते?
A: शरद पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.

Q4: या बैठकीचे महत्त्व काय आहे?
A: आगामी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीतिक बैठक निर्णायक ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com