Local Body Elections : उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना बसणार फटका...

SEC decision scrutiny day : आज उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे. या छाननीमध्ये अपूर्ण माहिती, कागदपत्रे असलेले अर्ज बाद करण्यात येतील. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना तातडीने पत्र धाडले आहे.
Local Body Elections
Local Body ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Nomination form scrutiny : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर आज अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने 17 नोव्हेंबरचे पत्र रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत धामधुम सुरू होती. अर्ज अवैध ठरू नये, यासाठी उमेदवारांकडून आवश्यक काळजी घेण्यात येत होती. अनेक डमी उमेदवारांचे अर्जही दाखल झाले आहेत.

आज उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे. या छाननीमध्ये अपूर्ण माहिती, कागदपत्रे असलेले अर्ज बाद करण्यात येतील. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना तातडीने पत्र धाडले आहे. या पत्रानुसार नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या विषयान्वये देण्यात आलेले ता. १७ नोव्हेंबर रोजीचे पत्र रद्द करण्यात येत असून सुधारित सूचना करण्यात येत आहेत.

Local Body Elections
BJP election impact : बिहारमध्ये जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे भाजपला जोरदार झटका; एका पराभवानंतर आमदाराचे नड्डांना लिहिले पत्र व्हायरल...

काय म्हटले आहे आयोगाने?

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे एकच सूचक असल्यास असे अर्ज अवैध ठरविले जाणार आहेत.

Local Body Elections
Election Commission SIR : मतदारयाद्यांच्या कामासाठी प्रेशर, दोन BLO च्या आत्महत्येने खळबळ, निवडणूक आयोग अडचणीत?

मात्र, डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास आणि तो डमी उमेदवार इतर कागदपत्रे व अटी शर्तीची पूर्तता करीत असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरिवण्यात यावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com