Mahayuti Politics : मोठा भूकंप होण्याआधीच फडणवीस अन् शिंदेंनी एक घाव दोन तुकडे केले; ‘नाराजी’वर 10 मिनिटांत मोठा निर्णय

Shiv Sena BJP dispute : महायुतीचे सरकार आहे. एका कुटुंबात वादविवाद होत असतात. त्यामुळे मनातल्या भावना एकमेकांकडे व्यक्त करायच्या असतात, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये पक्षांतरावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे नेते, नगरसेवक फोडण्याचे प्रमाण वाढल्याने अखेर शिवसेनेच्या नेत्यांच्या संयमाचा आज स्फोट झाला. त्यातूनच मंत्र्यांनी आज कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती.

मुंबईत आज मोठ्या घडामोडी घडल्या. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे मंत्र्यांनी शिंदेंसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर शिंदेंसह मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले. तिथेही शिवसेनेतील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याची नाराजी मंत्र्यांनी मांडल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अखेर त्यावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक म्हणाले, महायुतीचे सरकार आहे. एका कुटुंबात वादविवाद होत असतात. त्यामुळे मनातल्या भावना एकमेकांकडे व्यक्त करायच्या असतात. आज मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो. आमच्या मनातल्या काही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. दहा मिनिटांत त्यावर सोल्यूशनही निघाले.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mahayuti Politics : प्रफुल पटेलांना धक्का; राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंड, भाजपच्या माजी खासदाराचीही साथ

राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे फार मोठ्या प्रमाणात येऊ लागलात. कुणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, असं चालू होतं. प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही पक्षांतरं होत आहेत. त्यामुळे थोडी नाराजी काही प्रमाणात दोन्हीकडील लोकांची होती. ही नाराजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतली आणि त्यावर तोडगा काढला, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Local Body Elections : उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना बसणार फटका...

कुणीही कुठल्याही पक्षातील प्रामुख्याने महायुतीतील घटक पक्षातील नेते किंवा पदाधिकारी, नगरसेवक कुणीही आपल्या पक्षात घेऊ नये, अशी भूमिका ठरली आहे. सामोपचाराने यावर तोडगा निघाला आहे. कुणी कुणाला सुनावलं नाही. काही गोष्टी उपमुखमंत्र्यांना विचारून होत नाहीत, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाहीत. कळत नकळत काही गोष्टी घडतात. त्यामुळे विसंवाद होतो. असा विसंवाद होऊ नये, असं ठरलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढला आहे. गुण्यागोविंदाने हसतखेळत सगळे निर्णय झाले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी उद्यापासून होईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com