Lok Sabha Election 2024 : "चिन्हावर नव्हे, आम्ही आमच्या ताकदीवर जिंकून येऊ," हितेंद्र ठाकूरांना दृढ आत्मविश्वास

Hitendra Thakur On Palghar Lok Sabha : "आमच्याकडे दहाहून अधिक चेहरे आहेत, पण...", असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं.
hitendra thakur
hitendra thakursarkarnama

चिन्ह कोणतेही येऊ दे. चिन्हावर नाही; तर आम्ही आमच्या ताकदीवर जिंकून येऊ, असा दृढ विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला . सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या ( lok Sabha Election 2024 ) अनुषंगाने पालघर मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडी उमेदवार जाहीर करणार आहे. या निमित्ताने कार्यकर्त्यांचा कल व मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारी ( 19 एप्रिल ) आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विरार येथील जुने विवा कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी असे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीनंतर आमदार हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'आम्हीच जिंकून येणार', असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला आहे. "बहुजन विकास आघाडीकडे दहाहून अधिक चेहरे आहेत. यातील काहींनी स्वत:हून निवडणूक लढविण्यात स्वारस्य दाखवलेले आहे, तर काही नावे कार्यकर्त्यांनी सुचविलेली आहेत. येत्या दोन दिवसांत एकमताने यातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल," अशी माहिती आमदार ठाकूर यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पालघर लोकसभा निवडणूक ( Palghar Lok Sabha Election 2024 ) लढविण्याबाबत कार्यकर्त्यांत जोश आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने जव्हार, मोखाडा, पालघर आणि अन्य ग्रामीण भागांत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांना मी स्वत: आमदार क्षितिज ठाकूर, राजीव पाटील, मनीषा निमकर व अन्य नेते मार्गदर्शन करत आहेत," असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं.

"कार्यकर्त्यांनी अनेक नावे सुचवून माझी अडचण केली आहे. आमच्याकडे दहाहून अधिक चेहरे आहेत. पण एकमताने यातील एक नाव घोषित केले जाईल. युवा अथवा ज्येष्ठ असा भेद आमच्यात नाही. लोकांसोबत असेल तोच आमचा उमेदवार," अशा स्पष्ट शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवार नेमका कोण असेल, याबाबतचे संकेत दिले आहेत.

2009 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारला एकूण 2 लाख 23 हजार 234 मते मिळवून विजयी झाला होता. 2019 ला बहुजन विकास आघाडीचा 4 लाख 91 हजार 596 मतांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी 88,883 मतांनी पराभव झाला होता. मात्र, मागच्या पाच वर्षांत बविआच्या मतदारांत लक्षवेधी वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे बोईसर, वसई आणि नालासोपारा या तीन विधानसभा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीची ताकद आहे. या तीनही मतदारसंघांत साडेतीन लाखाहून अधिक मते बहुजन विकास आघाडीची आहेत. त्यातही मागील पाच वर्षांत बविआ समर्थकांची वाढ झालेली आहे. शिवाय विक्रमगड, डहाणू व पालघर या उर्वरित तीन तालुक्यांतही बहुजन विकास आघाडीच्या मतांचा टक्का 45 टक्क्यांपर्यंत आहे. या एकत्रित ताकदीवरच आमदार हितेंद्रठाकूर यांनी जिंकण्याचा दर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे.

hitendra thakur
Thane Lok Sabha Election : 'गुलदस्त्यात' असलेल्या ठाण्याच्या जागेवर गोगावलेंचं मोठं विधान; म्हणाले...

‘शिट्टी` या निवडणूक चिन्हाबाबत साशंकता?

2009 पासून 'शिट्टी' या चिन्हावर बहुजन विकास आघाडी निवडणुका लढवत आलेला आहे. त्यामुळे जनमानसात हे चिन्ह रुजलेले होते. मात्र, ‘शिट्टी` हे चिन्ह निवडणूक आयोगाकडे बविआने नोंदणीकृत केले नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी पक्षाने घेतला होता. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने हे चिन्ह गोठवले होते. त्या वेळी 'बविआ'ने रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीनिमित्ताने प्रसारमाध्यमांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला असता; "निवडणूक चिन्ह कोणतंही येऊ दे; आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येऊ," असे सांगत त्यांच्यासाठी निवडणूक चिन्ह दुय्यम असल्याचे स्पष्ट केले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

hitendra thakur
Raj Thackeray News : तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरेंचं मत धनुष्यबाणाला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com