Thane Lok Sabha Election : 'गुलदस्त्यात' असलेल्या ठाण्याच्या जागेवर गोगावलेंचं मोठं विधान; म्हणाले...

Bharat Gogawale News : माघार घेणारे भुजबळ काम करतील का? असा सवाल उपस्थित केल्यावर आमच्या इथे तटकरे यांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून करतोय ना त्यांचे काम.
Thane Lok Sabha Election
Thane Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाण्याच्या जागेबाबत महायुतीपुढे कसलीही अडचण नाही. येत्या दोन दिवसात ठाण्याचा तिढा सुटेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल किंवा 400 पार करायचे असेल आणि राज्यात 45 पार करायचे असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे, तसेच जर चाललो तर 45 पार करायला काही अडचण नाही, असेही ते म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

Thane Lok Sabha Election
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शुक्रवारी शिवसेनेच्या नेतेमंडळींची चर्चा पार पडली. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले यांनी ठाण्याच्या तिढ्या सुटणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच रत्नागिरीची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो. पण आम्ही ते सोडून आजपासून उमेदवारी अर्ज भरून, त्यांच्या प्रचाराला पण लागलो, असे गोगावले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thane Lok Sabha Election
Lok Sabha Election News : राष्ट्रवादीचे धाराशिव, नाशिकचे उमेदवार ठरले; 'या' नावांवर आज शिक्कामोर्तब

नाशिक (Nashik) येथे आमचा सिटिंग खासदार म्हणून ती जागा शिवसेनेची होती. त्याचप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि तिथे आमचा उमेदवार असावा असे वाटते. आता नाशिकची उमेदवारी नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते की खासदार हेमंत गोडसे यांना मिळणार याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे तिघे निर्णय घेतील, असेही गोगावले हे म्हटले.

Thane Lok Sabha Election
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार
Thane Lok Sabha Election
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

याशिवाय माघार घेणारे भुजबळ (Chhagan Bhujbal) काम करतील का? असा सवाल उपस्थित केल्यावर आमच्या इथे तटकरे यांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून करतोय ना त्यांचे काम. आता सुनेत्राताई पवार यांच्या प्रचाराला आम्ही तिथेही गेलो होतो, तसेच शिवाजीराव आढळराव पाटील त्यांच्याही प्रचाराला गेलो होतो. जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे. तिथे आम्ही जातोय जिथे आम्हाला आवश्यकता तिथे त्यांनी यावे. तरच, राज्यात 45 जागांचा आकडा आम्ही पार करू शकतो, असेही गोगावले यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Solapur BJP
Former IAS officer Debashish Sharma has been named the BJP candidate for the Nagaon Lok Sabha bypoll after joining the party days after his voluntary retirement.
Raosaheb Danve
Top-10-News 2
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com