Raj Thackeray News : तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरेंचं मत धनुष्यबाणाला!

Loksabha Election : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून राज ठाकरे यांनी आपले उमेदवार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उतरवले.
 Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

Loksabha Election : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.. राज ठाकरे राहत मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यंदा धनुष्यबाणाला म्हणजे उमेदवार राहुल शेवाळे यांना मतदान करतील. तब्बल 18 वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे धनुष्यबाण चिन्हाला राज ठाकरे मतदान करतील, हे शेवाळे यांनीच सांगितले.

 Raj Thackeray
Sanjay Raut: 'लोकसभेनंतर ठाकरे गटात फक्त पिता-पुत्रच...,' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शिंदे गटाचं प्रत्तुत्तर

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून राज ठाकरे यांनी आपले उमेदवार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उतरवले. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, काही ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले नव्हते, तर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका त्यांनी घेतली होती. तेव्हा उमेदवार त्यांनी रिंगणात उतरवले नव्हते. मात्र, मोदींच्या विरोधात आघाडीकडून प्रचार केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठाकरे हे तब्बल 18 वर्षांनंतर धनुष्यबाण चिन्हाला मतदान करतील. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.17 मेच्या महायुतीच्या सभेत राज ठाकरे मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील, असे राहुल शेवाळे म्हणाले.

मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतील मराठी मते मिळवण्यासाठी टक्कर होत होती. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. तर, उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यात मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघात ते एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करतील. म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरे ज्या पक्षातून बाहेर पडले त्यालाच मतदान करणार आहेत.

R

 Raj Thackeray
Narendra Modi News : काँग्रेसच्या युवराजांवर आरोप ते गॅरंटी ही तीन अक्षरांचा खेळ नाही; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख दहा मुद्दे..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com