Pravin Darekar News : भाजपला गुजरातमध्ये 26 पैकी 26 जागा, महाराष्ट्रात किती? प्रवीण दरेकरांनी सांगितली सगळीच आकडेवारी

Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी घटल्याने मंत्री,कार्यकर्त्यांवर टीका केली जात आहे. मात्र, दरेकर यांनी त्यांची बाजु घेतली. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले, असे दरेकर म्हणाले.
Pravin Darekar
Pravin Darekar sarkarnama

Lok Sabha Election : सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वी पाच टप्प्यांमध्ये कोणाला किती जागा मिळणार याची आकडेवारी करण्यात येत आहेत. भाजपचे नेते 400 जागा मिळणारच असे ठासून सांगत आहेत. महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता लागली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गुजरातमध्ये भाजपला 26 पैकी 26 जागा मिळतील. कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यात एनडीएला चांगलं यश मिळेल,असे सांगत महाराष्ट्रात मिळणारा जागांचा आकडा देखील सांगला.

प्रवीण दरेकर Pravin Darekar म्हणाले, महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात आम्हाला 40 च्या आसपास जागा मिळतील.उत्तर प्रदेश, बिहारमध्ये चांगले यश मिळेल. कर्नाटककर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही पैकीच्या पैकी जागा मिळतील, असा दावा दरेकर यांनी केला.

Pravin Darekar
Chhagan Bhujbal News : अमित शाहांची पसंती तरी भुजबळांना का नाही मिळाली उमेदवारी? मोठं कारण आलं समोर

मतदानाची voting टक्केवारी घटल्याने मंत्री,कार्यकर्त्यांवर टीका केली जात आहे. मात्र, दरेकर यांनी त्यांची बाजु घेतली. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुर्देवाने उष्णता आणि मतदानाच्या दिवशी लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर पाहिजे तरच मतदानाची टक्केवारी वाढेल. केवळ नेत्यांची, मंत्र्यांची इच्छा असून चालणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आनंदराव अडसूळ यांच्यावर टीका

शिंदे गटाचे नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा पराभूत होणार असल्याचा दावा केला होता. हा दावा करताना त्यांनी राणा यांना नाटकबाज म्हणत कठोर शब्दांत टीका केली होती. महायुतीत असूनही अडसूळ यांनी महायुतीच्या उमेदवारावर टीका केल्याने प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीत एकत्र राहून आपल्या युतीसंदर्भात विरोधात बोलणे ही विकृती आहे. अशा प्रकारचे बोलणे महाराष्ट्रात आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे दरेकर म्हणाले.

Pravin Darekar
MLC Election 2024 : मुंबई पदवीधरमधून ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार मैदानात, तर शिक्षक मतदारसंघातून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com