Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे संजीव नाईक ठाणेदार? उमेदवारीचे दिले संकेत...

Thane Lok Sabha Constituency : एका आठवड्यात उमेदवारीबाबत निर्णय जाहीर होणार...
Lok Sabha Election 2024 | Thane Lok Sabha Constituency | Sanjeev Naik
Lok Sabha Election 2024 | Thane Lok Sabha Constituency | Sanjeev NaikSarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाणेदार होण्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपापली दावेदारी केली आहे. यावर आता माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संजीव नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना, 'येत्या आठवड्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि महायुतीतला कोणता पक्ष ही निवडणूक लढवणार, हे जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उमेदवारीबाबत बोलताना नाईक यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमटले. त्यामुळे आपणच ठाणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहोत, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवल्याची चर्चा होत आहे. (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 | Thane Lok Sabha Constituency | Sanjeev Naik
Shivsena Container Branch : ठाणे मनपाच्या आरक्षित जागेवर शिवसेनेची 'कंटेनर शाखा' ; भाजप आमदाराने आयुक्तांना धरले धारेवर!

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपमधून माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक यांची तर शिवसेना शिंदे गटातून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार आनंद परांजपे ही नावे पुढे आली होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी निवडणुकीच्या कामाला सुरू केली. (Latest Marathi News)

गुरुवारी माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिकेत येऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना संवाद साधताना त्यांनी 'भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, त्यांचा निर्णय सर्वांनाच मान्य असणार आहे. तसेच आम्ही निवडणुकीच्या पलीकडे जाऊन पुढे काम करतोय आहे. काही दिवसापूर्वी महायुतीची या ठिकाणी सभा झाली. या शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षांचे कार्य आणि या ठिकाणी होणारा भवि विकास आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो आहोत, असे नाईक म्हणाले. "एका आठवडाभरामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि महायुतीतला कुठला पक्ष येथे निवडणूक लढवेल या संदर्भामध्ये निर्णय लवकरच जाहीर करतील, असे मला विश्वास आहे," असे ही ते म्हणाले. (Latest Political News)

Lok Sabha Election 2024 | Thane Lok Sabha Constituency | Sanjeev Naik
Rajan Salvi : माझ्याप्रमाणे भावाच्या मागेही चौकशीचं शुक्लकाष्ठ; आमदार राजन साळवींचा आरोप

उमेदवारीबाबत विचारले अन् उमटले हास्य -

पत्रकारांशी संवाद साधताना, नाईक यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या विषयी प्रश्न विचारण्यात आला. उमेदवारीबाबत भाष्य करताना संजीव नाईक यांच्यावर चेहऱ्यावर आपसूकच हास्य उमटल्याचे दिसून आले. या हास्याचे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. यातून त्यांनी ठाण्याचे आपणच ठाणेदार आहोत, असे सुचित केल्याची चर्चा होती. आपणच उमेदवार असल्याचे त्यांच्या या हास्यावरून त्यांनी दर्शविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसून आले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com