Thane Municipal Corporation News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले असताना, त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याने महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा सुरु करत तो भूखंड हडपण्याचा डाव आखल्याचे दिसून आले आहे. हीच बाब सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष असलेल्या भाजप ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणून दिली आहे.
तसेच कळवा- मुंब्रा आणि दिवा येथे अनधिकृत 'इमेल' उभे राहिल्याचे छायाचित्रासह पुरावे देत, याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आमदार केळकर यांनी जाब विचारला. तसेच तो कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्याच्या शेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्यात येतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर(Sanjay Kelkar) यांनी शहरातील अनधिकृत बांधकांबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला.
अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात. परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मुग गिळुन बसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये, अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे यांनी बजावले.
घोडबंदर रोडवरील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवले. 2021 साली याच जागेवर कपाऊंड टाकुन लोकोपयोगी मुलभूत सोईसुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते.
तरीही 24 जानेवारी रोजी याठिकाणी कंटेनर ठेवून 27 जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.