Bhiwandi News, 22 May : देशातील 49 जागांवर पाचव्या टप्प्यात अर्थात 20 मे रोजी मतदान पार पडलं. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह भिवंडी, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नाशिक, दिंडोरी येथे मतदान झालं. त्यातच भिवंडीत मतदानावेळी कपिल पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. हे कपिल पाटील यांना महागात पडलं आहे. कपिल पाटील यांच्यावर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल पाटील ( Kapil Patil ) यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, उपाध्यक्ष रवी सावंत आणि दादा गोसावी यांच्यावर कलम 108, 504, 506 नुसार शांतीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. कपिल पाटील यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं कपिल पाटलांना लक्ष्य केलं होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नेमकं काय घडलं होतं?
भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. यानंतर कपिल पाटील हे तिथे पोहचले होते. त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी करत शिवीगाळ केली होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच, कपिल पाटील यांच्यावर टीकास्र डागण्यात येत होते.
यानंतर आता कपिल पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 186, 504, 506 कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.