Gajanan Kirtikar News: मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, शिवसेना नेत्याचे CM शिंदेंना पत्र

Gajanan Kirtikar Vs Shivsena Shinde Group: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते गजानन किर्तीकर हे पुन्हा ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Gajanan Kirtikar, Eknath ShindeSarkarnama

Gajanan Kirtikar News: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते गजानन किर्तीकर हे पुन्हा ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करण्याच्यातयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण लोकसभेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवारांनी दिलेले उमेदवार तगडे होते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असं म्हणत त्यांनी शिंदेसेनेला घरचा आहेर दिला आहे. शिवाय त्यांच्या या वक्तव्याने शिवसेनेत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचा मुलगा अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) हा ठाकरेंच्या सेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतील (North West Mumbai) उमेदवार आहे. तर त्याची लढत शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याशी आहे. तर निवडणुकीच्या धामधुमीतच कीर्तिकर यांनी मोदींविरुद्ध काही वक्तव्यं केली होती. शिवाय आता चक्क महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं म्हटलं. त्यामुळे आता किर्तीकर यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे "लाचार श्री" होणाऱ्यांनी पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा.

गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना शिवसेना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन किर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती.

गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Pune Porsche Accident News : पब चालविणे गंमत आहे का? न्यायालयाचे खडेबोल; नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com