Lok Sabha Election 2024 : वायकरांच्या 'अंगणात' महाविकास आघाडीची कीर्तीकरांसाठी प्रचारसभा; शिवसैनिक भिडणार?

Mumbai Lok Sabha Election 2024 : 'मुंबईतील तीन जागांवर शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशीच लढाई पाहायला मिळणार आहे.'
Mumbai Lok Sabha Election 2024
Mumbai Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Mumbai News : मुंबईतील सर्वच सहा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या जागांवरील युती आणि आघाडीच्या सर्वच जागांवर आता उमेदवारांची घोषणा झाली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराला आणखीनच वेग येणार आहे. दरम्यान मुंबईत दोन गटातील शिवसैनिक आमने-सामने असल्याने मुंबईतील लढती अत्यंत चरशीच्या होणार आहेत. (Latest Marathi News)

मुंबईतील तीन जागांवर शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशीच लढाई पाहायला मिळणार आहे. काल उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता ही लढाई दोन गटांच्या शिवसैनिकांमध्ये होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mumbai Lok Sabha Election 2024
Bhushan Patil : मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसची भूषण पाटलांना उमेदवारी; पीयूष गोयलांशी लढत!

वायकरांच्या 'अंगणात' सभा -

आज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. यासाठी आता एकेकाळचे आमदार वायकर यांचे सहकारी राहिलेले नेते त्यांच्याविरोधात आता राजकीय टीकेचा सूर आवळणार आहेत.

Mumbai Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?
Mumbai Lok Sabha Election 2024
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री अनिल परब, ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुनील प्रभू व अन्य नेते या मेळाव्याला उपस्थित राहून महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता जोगेश्वरी पूर्वेकडील अरविंद गंडबिर हायस्कूल प्रागणात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत वायकर यांच्या विरोधात कोण आणि काय बोलणार हे पाहावे लागेल. (Lok Sabha News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com