Mumbai News: मनसेच्या होम पिचवर 'मोदी-राज'; आजच्या सभेसाठी मनसैनिक-भाजप नेते 'हम साथ साथ है...'

Maharashtra Lok Sabha Election 2024: मोदी-राज यांच्या संयुक्त सभेसाठी मनसे सक्रिय झाली आहे. गर्दी जमवण्यासाठी मनसेच्या मनसेच्या विभाग प्रमुखांना चाळीस बसचे टार्गेट दिल्याचे समजते.
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024Sarkarnama

Mumbai News:लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीच्या प्रचाराच्या तोफा उद्या (शनिवारी) थंडावत आहेत. आज मुंबईत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी आजची ही सभा अत्यंत महत्वाची असणार आहे. या सभेसाठी मनसेने शिवाजी पार्क मैदान बुक केले होते. येथे आता महायुतीची सभा होणार आहे.

ही सभा ऐतिहासिक व्हावी, यासाठी काही दिवसांपासून मनसे-भाजपचे नेते कामाला लागले आहेत. सभेच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होत आहेत. मनसे नेते, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, तर भाजपकडून आशिष शेलार, नितेश राणे, प्रसाद लाड या नेत्यांचा समन्वय समितीत समावेश आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Politics: महापालिकेसाठी उमेदवारी पाहिजे? लोकसभेला प्रभागात 'लीड' मिळवून द्या! इच्छुकांना ॲाफर

मनसेचे होम पिच असलेल्या शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्यापासून ते सभा यशस्वी करण्यापर्यंत मनसे-भाजपने तयारी केली आहे. मोदी-राज यांच्या संयुक्त सभेसाठी मनसे सक्रिय झाली आहे. गर्दी जमवण्यासाठी मनसेच्या मनसेच्या विभाग प्रमुखांना चाळीस बसचे टार्गेट दिल्याचे समजते.

सभेपूर्वी मोदींचा शिवाजी पार्क परिसरात रोड शो होण्याची शक्यता आहे. मात्र नुकताच झालेल्या घाटकोपरच्या रोड शोनंतर झालेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोदींचा रोड शो होणार नाही, अशीही चर्चा आहे. मुंबईकर मतदारांना आवाहन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुंबईत सभा होत आहेत.यानिमित्ताने एकमेकांच्या विरोधात तोफा धडाडणार आहेत. महायुती-महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. आघाडीची बीकेसीवर सभा होत आहे.

मुंबईत लोकसभेच्या सहा जागा

  • राज्यातील राजकीय वातावरण बदलून शिवसेनेचे दोन गट झाले आहेत.

  • महायुतीने विशेषतः भाजपाने मुंबईसाठी जोर लावला आहे.

  • शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने एकत्र येत महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

  • मुंबईतील लोकसभेची लढाई महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाची आहे.

  • 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्व जागा युतीने जिंकल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com