Wardha Lok Sabha Election 2024: मला तिकीट द्या; कराळे मास्तरांचं शरद पवारांना साकडं

"माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गावागावात पोहोचलेला असून लोकांमध्ये माझा संपर्क आहे. त्यामुळे मला उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल याबाबत मी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली."
Nitesh Karale, Sharad Pawar
Nitesh Karale, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Karale meets Sharad Pawar: वर्धा लोकसभा निवडणुकीसाठी (Wardha Lok Sabha Elections) आपल्याला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे यासाठी नितेश कराळे (Nitesh Karale) मास्तर प्रयत्नात आहे. यासाठी कराळे मास्तर यांनी आज सातव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी कराळे यांनी आपला गृहपाठ शरद पवारांसमोर मांडला त्यानंतर पवारांनी देखील आपल्याला प्रचाराबाबत काही सूचना केल्या असल्याची माहिती कराळे यांनी दिली.

शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कराळे (Nitesh Karale) म्हणाले, "वर्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे यासाठी मी शरद पवार यांची सातव्यांदा भेट घेतली आहे. यावेळी शरद पवारांनी तुम्ही उमेदवारीच्या रेसमध्ये असून काम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत." तर 26 किंवा 27 तारखेला उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं कराळे मास्तरांनी सांगितलं. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गावागावात पोहोचलेला असून लोकांमध्ये माझा संपर्क आहे. त्यामुळे मला उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल याबाबत मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर शरद पवारांनीही आपणाला प्रचाराबाबत काही मार्गदर्शन केल्याचं कराळेंनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अद्याप महाविकास आघाडीकडून (MVA) कोणत्याही नेत्याची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली नाही. काँग्रेसचे (Congress) काही नेते लोकसभेसाठी इच्छुक असले तरी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने मला उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असून लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचंही कराळे यांनी सांगितलं.

Nitesh Karale, Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 News : 12 तारखेला 12 वाजता..! शिवतारेंचा निर्धार...असा आहे लोकसभेचा प्लॅन

मी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला नसला तरी पूर्वीपासून मी महाविकास आघाडीचे काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या सभा घेत आहे. त्याला 5 ते 10 हजार लोक येत आहेत. सद्य परिस्थितीमध्ये प्रस्थापित कोणताही आमदार-खासदार मोदी सरकार विरोधात बोलायला तयार नाही त्यांना ईडी-सीबीआयची (ED) भीती आहे. माझ्या बापाच्या घरी प्रॉपर्टी नाही, त्यामुळे माझ्या घरी ईडी, सीबीआय येणार नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणावरती मी सडेतोड टीका करत आलेलो आहे. जेवढे आमदार आणि खासदार मोदी सरकार (Modi Government) विरोधात बोलले नाहीत तेवढं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो असल्याचंही ते यावेळी म्हणाले.s

Nitesh Karale, Sharad Pawar
NCP Manifesto Committee : लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर; वळसे पाटलांकडे अध्यक्षपदाची धुरा

वर्ध्यामध्ये मागील तीन निवडणुका पाहिल्या तर काँग्रेस राष्ट्रवादीला (NCP) मानणारा साडेतीन लाख मतदार आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत विविध समाजातील तीन ते साडेतीन लाख मतदार जोडले जाऊ शकतात. त्यामुळे तब्बल 6 लाख मतदारांचा पाठिंबा आपल्याला मिळून आपण विजयी होऊ शकतो असा विश्वासही कराळे यांनी व्यक्त केला. तसेच आता मतदारसंघांमध्ये जाऊन कामाला लागणार असल्याचंही त्यांनी यावेली सांगितलं

Nitesh Karale, Sharad Pawar
Dhangekar Vs Murlidhar: त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद; धंगेकरांचा मोहोळांना धोबीपछाड

कोण आहेत शिक्षक नितेश कराळे

नितेश कराळे यांना संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया युजर्स त्यांना कराळे मास्तर म्हणून ओळखतात. ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेतील आगळ्यावेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे फेमस आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फालोअर्स असून त्यांच्या व्हिडिओची समाज माध्यमांवर सतत चर्चा असते.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com