Mumbai News : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीसह रणनीती आखण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महायुतीबाबतच्या बैठकांबाबत राज ठाकरेंवर राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. (Latest Marathi News)
विनायक राऊत म्हणाले, "प्रत्येक निवडणुकीत आपला स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष इतर पक्षांकडे गहाण ठेवायचा ही पद्धत मनसेप्रमुखांची पूर्वीपासूनची आहे. ती पद्धत या निवडणुकीतही दिसून येत आहे. याही वेळी त्यांनी पक्ष गहाण ठेवला आहे. त्यामुळे अशा सेटिंगबाजीला आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, असे राऊत म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसर्यांच्या पैशावर जगणारा नितेश राणेंसारखा मी कधी मिंधा झालो नाही. नितेश राणेंनी केवळ लाचारी पत्करली. अशी लाचारी विनायक राऊतने कधी पत्करली नाही. मला रिटर्न तिकीट देण्यापेक्षा ते तिकीट तुमच्याकडेच ठेवा, कारण तुम्हाला रिटर्न पाठवण्याचं तिकीट लोकांनी तयार ठेवलं आहे, असे राऊत (Vinayak Raut) म्हणाले.
आजच्या सिल्वर ओकवरील बैठक ही आघाडीतील प्रमुख पक्षांची आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला (vanchit Bahujan Aghadi) अजून किती जागा देता येतील? जागा वाढवता येईला का? याचा विचार होईल, याचीही चाचणी करण्यात येत आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.