Sanjay Raut News : 'त्यांचे विमान फक्त गुजरातला जाऊ नये'; खासदार राऊतांनी कोणाला हाणला टोला !

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसमध्ये वाद विकोपाला
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार वाद सुरू आहे. ही जागा काँग्रेसला द्यावी, यासाठी आमदार विश्वजित कदम हट्टाला पेटले आहेत. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर ही जागा काँग्रेसचे नेते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना द्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

महाविकास (Mahavikas) आघाडीत निर्णय झालेला नसतानाही ठाकरे गटाने या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज झालेला आहे. ही चूक सुधारावी, अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून या जागेसाठी सेनेवर दबाव टाकला जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे तीन दिवस सांगली दौऱ्यावर आले आहेत. ते सांगलीत आल्यानंतर काँग्रेसचे नाराज आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील हे दिल्ली येथे गेले आहेत. यावरूनदेखील आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Jayant Patil : 'हसन मुश्रीफ पैशांनी गब्बर...' जयंत पाटलांचा हल्लाबोल

सांगली दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत यांनी सांगलीची जागा आम्हीच लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी त्यांनी आलात तर तुमच्याबरोबर अन्यथा तुमच्याशिवाय, असा इशारा काँग्रेसला (Congress) दिला होता. त्यानंतर शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा यावर भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राऊत यांनी आमदार कदम आणि काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असलेल्या विशाल पाटील यांना कडक शब्दांत टोला लगाविला आहे.

खासदार राऊत सांगलीत आल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला गेले आहेत. पाटील यांच्या उमेदवारीसाठी आमदार कदम आग्रही आहेत. त्याबाबत खासदार राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, त्यांचे पायलट कोणीतरी आहेत. ते पायलेट नेईल तिकडे जात आहेत. आता ते विमान गुजरातला (Gujarat) उतरू शकते, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गटातील वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut
Vidharbha: विदर्भात दुरंगी, तिरंगी लढत; 'त्या' आठ मतदारसंघांत 53 उमेदवारांचे अर्ज अवैध !

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना मित्रपक्षाने सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात खासदार राऊत यांना विचारले असता, राऊत यांनी पवारांच्या वक्तव्यावर मला काही बोलायचं नसल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. भिवंडीची जागा पण काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केल्याचे ते म्हणाले. मात्र, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकेल, असा विश्वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

R

Sanjay Raut
Kolhapur Hasan Mushrif News : 'मंडलिकांची अडचण होईल असे कुणीच काही करू नका'; हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना सुनावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com