Ramdas Athawale : महायुतीचे टेन्शन वाढलं, रामदास आठवले म्हणतात 'काँटे की टक्कर' 'एवढ्या' जागा जिंकणार

Lok Sabha Election 2024 : मी परभणीतून जिंकणार आणि पंकजा मुंडे बीडमधून जिंकणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले होते.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

Political News : आम्ही 40 पेक्षा जास्ता जागा जिंकणार, असे भाजपचे नेते ठासून सांगत आहेत. तर, महाविकास आघाडी तब्बल 35 जागा जिंकेल असा दावा महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होणार असला तरी विजयाचे दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत. महायुतीचे उमेदवार, रासपचे नेते महादेव जानकर यांनी Mahadev jankar महायुती 42 जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील महायुती किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे.

रामदास आठवले Ramdas Athawale म्हणाले, यंदा काँटे की टक्कर होती. मात्र महायुती 35 ते 40 जागा जिंकणार आहेत. महादेव जानकर यांनी 42 जागा जिंकण्याचा दावा केलेला असताना त्यापेक्षा कमी जागांचा दावा करून आठवलेंनी महायुतीचेच Mahayuti टेन्शन वाढवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Athawale
Nilesh Lanke V/S Sujay Vikhe : धनशक्ती की, जनशक्ती, विखे की, लंके; विजयाचा गुलाल कोणाचा? चर्चांना उधाण...

काळ्या दगडावरची पांढरी रेष

महादेव जानकरांनी महायुती 42 जागा जिंकणार या दाव्या सोबतच मी परभणीतून जिंकणार आणि पंकजा मुंडे बीडमधून जिंकणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचे म्हटले होते. या दोन जागांसोबतच बारामतीची देखील जागा महायुती जिंकणार असल्याचे जानकर म्हणाले होते.

भाजप 15 जागा जिंकणार

महायुतीच्या नेत्यांकडून भाजप 40 जागा जिंकण्याचा दावा केला जात असला तरी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप केवळ 12 ते 15 जागा जिंकत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे मतदान टक्का कमी करून त्यांना सत्तेत खाली खेचण्याचा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.

Ramdas Athawale
Girish Mahajan news: गिरीश महाजनांनी वाढवली भाजप आमदारांची धडधड!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com