Lok Sabha Constituency Election 2024 : कुठे घेऊन बसलात मोदी, शाह, महाराष्ट्रात तर पवारसाहेब- ठाकरेंचीच छाप !

Mahavikas Aaghadi Leading In Pune Constituency : पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांचाच करिष्मा, चारपैकी दोन मतदारसंघातील उमेदवारांना लीड..
Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Lok Sabha 2024 Results LIVE : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्यातील मतदान 1 जून रोजी पार पडल्यानंतर त्याच दिवशी लगेचच एक्झिट पोलचे अंदाज आले.त्यानुसार शिरुर लोकसभेत आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) डॉ.अमोल कोल्हे हे विजयी होणार असल्याचे म्हटले होते.त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु असल्याचे मतमोजणीच्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता दिसून आले.

दरम्यान, देशात थोडी मोदी लाट दिसली असली,तरी महाराष्ट्रात,मात्र ती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची दिसून येत आहे.त्यातूनच महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा राज्यात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 48 पैकी तब्बल 30 जागांवर आघाडी ही आघाडीवर असून युतीने फक्त 18 ठिकाणी लीड घेतलेले आहे.गेल्यावेळी युतीला राज्यात तब्बल 41 जागा मिळाल्या होत्या.

महायुतीत भाजपची कामगिरी राज्यात अपेक्षेनुसार झाली नसली,तर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांपेक्षा ती कितीतरी उजवी झाली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी,मात्र निराशाजनक दिसते आहे.तर,आघाडीतील राष्ट्रवादी,कॉंग्रेस आणि ठाकरे शिवसेना या तिघांची एकत्र घौडदौड सुरु आहे.त्यात शिवसेना एक नंबरवर आहे.

शिरुरमध्ये दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे.तेथे सिनिअर पवार शरद पवारांकडून कोल्हे उमेदवार आहेत.तर, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महायुतीकडून (अजित पवार राष्ट्रवादी) माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना अजित पवारांनी उभे केले आहे.त्यासाठी त्यांना शिंदे शिवसेनेतून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतले.

त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचे मतमोजणीच्या पहिल्या आठ फेऱ्यांतून दिसून आले आहे. कारण आठव्या फेरीअखेर कोल्हे हे 36 हजार 815 मतांनी आघाडीवर आहेत.त्यांच्या पराभावचे चॅलेंज अजितदादांनी दिले होते.पण, ते खरे होताना दिसत नाही.एकूण रागरंग पाहता कोल्हे हे गतवेळपेक्षा (57 हजार) अधिक लीडने यावेळी निवडून येतील असा अंदाज आहे.

Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 Results : पुण्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शरद पवारांचा जलवा...

अजित पवारांवर नामुष्की येणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीत चार जागा राज्यात लढवल्या.त्यातील तीन जागांवर ते पिछाडीवर आहेत.त्यातही बारामतीतील पिछाडी त्यांच्यावर नामुष्की आणेल,अशी चिन्हे दिसत आहेत. कारण तेथे त्यांच्या पत्नी सुनेत्रा या उमेदवार आहेत.तर,त्यांच्याविरुद्ध विद्यमान खासदार आणि शरद पवारांच्या लेक सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तेथील लढत ही सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी नाही, तर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी झाली आहे.

तशीच ती शिरुरमध्येही झाली. तेथे सुद्धा कोल्हे विजयी झाले,तर अजितदादांवर डबल नामुष्कीची पाळी त्यांच्या बालेकिल्यातच म्हणजे पुणे जिल्ह्यात येणार आहे.त्यांचे उमेदवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकमेव रायगडमधून लीडवर आहेत.ते विजयी झाले,तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची इभ्रत वाचणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Shivsena Analysis: सब बर्दाश्त किया जाएगा, लेकीन 'खोके'बाजी नही; मुंबई ठाकरेंचीच ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com