Devendra Fadnavis : दिल्लीच्या भेटीनंतर आत्मविश्वास वाढला, 'पळणारा नाही, लढणारा', देवेंद्र फडणवीस कडाडले

Lok Sabha Election Result Devendra Fadnavis : मुंबईत महाविकास आघाडीला 24 लाख मतं मिळाली. तर, महायुतीला 26 लाख मतं आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

Devendra Fadnavis News : महायुतीला महाराष्ट्रात अवघ्या 17 जागा मिळाल्या. दुहेरी अंकातील भाजप सिंगल डिजेटमध्ये आली. या पराभवाने निराश झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रिमंडळातून मोकळे करण्याची विनंती शीर्षस्थ नेत्यांना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली. मात्र, दिल्ली अमित शहांची भेट घेवून परत आलेल्या देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास दुणावला आहे. विरोधकांना 'पळणारा नाही लढणारा देवेंद्र फडणवीस आहे', असे ठणकावले.

मुंबईतील भाजपच्या आढावा बैठकीत देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, 'कोणाला वाटले असेल मी निराशा झालो. भावनेच्या भरात बोललो, ते खरे नाही. तुम्ही सगळ्यांनी विश्वास दाखवला आहे. मी अमित शहांना भेटून आलो. त्यांना माझ्या मनात काय हे सांगितलं. तुमच्या पेक्षा त्यांच्या वेगळ्या भावना नव्हत्या. एकही मिनिट मी शांत बसणार नाही.'

विरोधकांनी नरेटिव्ह सेट केले की संविधान बदलणार, त्याचा फटका आपल्याला बसला. आपल्या आणि विरोधी पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत अर्ध्या टक्याचा फरक आहे. मुंबईत महाविकास आघाडीला 24 लाख मतं मिळाली. तर, महायुतीला 26 लाख मतं आहेत. महाविकास आघाडीपेक्षा आपल्याला दोन लाख मतं जास्त आहेत. मात्र महाविकास आघाडीला चार जागा तर आपल्याला दोन जागा मिळाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : लोकसभेचा पराभव जिव्हारी; फडणवीसांनी दिले मोठ्या राजकीय बदलाचे संकेत; म्हणाले, 'नवी पेरण्याची वेळ...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com