BJP News: भाजपचा राम अवतरला!...;मोदींचा करिश्मा कमी झालाय?

Atal Bihari Vajpayee News:महायुतीच्या कार्यकर्त्यांना आश्चर्यचा धक्का
BJP News
BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane: हिंदुस्थानात नाही जगभरात मोदी..मोदी असेच चित्र निर्माण करण्यात आले असताना, आता अचानक आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'राम' अवतरला पण, लक्ष्मणाचा विसर पडला. ठाण्यात पार पडलेल्या महायुतीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे छायाचित्र पाहण्यास मिळाले. वाजपेयी हे भाजपचा आयकॉनिक चेहरा असताना, तोच चेहरा मोदी सरकार आल्यानंतर कळत नकळत काळाच्या पडद्याआड झाला होता. भाजपचा अचानक राम (अटलबिहारी वाजपेयी) अवतरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा महाराष्ट्रात कमी झाल्याचे तर दर्शवत नाही ना असे दिसत आहे.

एकाच दिवशी ३६ जिल्ह्यात रविवारी महायुतीचा मेळावा झाला. यावेळी, मोदींना निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी केली. मेळाव्यात सर्वांकडून मोदींवर कौतुक उद्गार काढण्यात आले. ठाण्यातील महायुतीचा मेळावा एकप्रकारे भाजपने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेळाव्यातील वातावरण भाजपमय झाले होते. व्यासपीठावर बहुतेक नेतेमंडळी भाजपची मांदियाळी पाहण्यास मिळाली. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील असो या कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण असो, माजी मंत्री तथा आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक , विनय सहस्त्रबुद्धे या मंडळीस आदी महायुतीचे मित्रपक्ष उपस्थित होते.

महायुतीचा मेळाव्यातील व्यासपीठासह मेळावा परिसरात महायुतीचे बॅनर लावण्यात आले होते. बॅनरच्या मध्यभागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या अजित पवार यांचे फोटो होते. डाव्याबाजूला बाळासाहेब, आनंद दिघे आणि यशवंतराव चव्हाण तर उजव्या बाजूला मोदी, शाह आणि नडा यांचे फोटो नेहमीप्रमाणे पाहण्यास मिळाले. मात्र आणखी एक फोटो राहून राहून लक्षकेंद्रित करत होता. तो म्हणजे माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा तो फोटो. वाजपेयी यांचा फोटो पाहून मेळाव्यात जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना जणू आश्चर्यचा धक्का बसला असावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी सरकार आल्यावर बॅनर फक्त एकच चेहरा पाहण्यास मिळत होता. ती फोटोतील छबी म्हणजे नरेंद्र मोदी यांची. पण, आताच का वाजपेयींचे छायाचित्र का लावण्यात आले असा प्रश्न भाजपसह मित्रपक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. भाजपचा राम आताच कसा अवतरला. मग लक्ष्मण कुठे गेला. वाजपेयींच्या फोटोमुळे कुठे तरी मोदी यांच्या करिश्माला धक्का बसला आहे का? किंवा महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारण अंगाशी येईल याची भीती भाजपला वाटते असेच बोलले जात आहे. पण दुसरीकडे 'देर आये पर दुरुस्त आये' अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

BJP News
Thane News: ठाण्यातील तीनही जागा जिंकण्याचा शिंदेंचा निर्धार; राम मंदिर बांधण्यासाठी मोदींना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com