Rajesh Patil files nomination
Rajesh Patil files nominationsarkarnama

Palgar Loksabha : अवघ्या 40 मिनिटांत उमेदवारी अर्ज दाखल, राजेश पाटलांचा अनोखा विक्रम?

Rajesh Patil : उमेदवारी अर्ज दाखल करताना तो खुप बारकाईने त्यातील तपशील भरावा लागतो. छोट्या चुकीमुळे देखील अर्ज बाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे उमेदवार तज्ज्ञ वकिलांची फौज नेमत अर्ज दाखल करतात.

Loksabha Election : पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीने अजुनही आपल्या उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील यांना उमेदवारी देत पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंग लढत होणार असल्याचे चित्र निर्माण केले. राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेत तो अवघ्या 40 मिनिटांत दाखल करत वेगळा विक्रम केल्याचा दावा बहुजन विकास आघाडीकडून BVA केला जात आहे.

Rajesh Patil files nomination
Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाडांचा 'डॅमेज कंट्रोल'; 'हात' सोडलेल्या नसीमभाईंना बहिणीची साद...

उमेदवारी अर्ज दाखल करताना तो खुप बारकाईने त्यातील तपशील भरावा लागतो. छोट्या चुकीमुळे देखील अर्ज बाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे उमेदवार तज्ज्ञ वकिलांची फौज नेमत अर्ज दाखल करतात. मात्र, बविआचे उमेदवार राजेश पाटील Rajesh Patil यांनी शुक्रवारी (ता.26) सकाळी 11.20 मिनिटांनी नामनिर्देशन पत्र घेतले गेले. आणि लगेच 12 वाजता सर्व सोपस्कार पूर्ण करून नामनिर्देशन पत्र दाखल केले. म्हणजे अवघ्या 40 मिनिटांत त्यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी Palghar Lok Sabha constituency उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 3 मे आहे. अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता.26) पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, केवळ 40 मिनिटांत नामनिर्देशन पत्र आणि प्रतिज्ञापत्र तयार करून सादर करणारा बविआ हा संपूर्ण भारतातील एकमेव पक्ष ठरला आहे, असा दावा बविआचे अॅड. नितीन भोईर यांनी केला आहे. पक्षाची कायदेशीर टीम, मुकेश सावे, उमेश नाईक, अजिव पाटील यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाल्याचेही भोईर यांनी सांगितले.

पालघरमध्ये तिरंगी लढत

महाविकास आघाडीकडून भारती कामडी या उमेदवार आहेत. महायुती देखील आपला उमेदवार लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. बविआकडून राजेश पाटील हे निवडणूक रिंगणात असणार आहेत. जर राजेश पाटील यांनी माघार घेतली नाही तर पालघरमध्ये तिरंगी लढत होणार हे पक्के आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com