Palghar News : पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी कोणाला उमेदवारी देते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच बहुजन विकास आघाडीत सहा जणांनी उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे श्रेष्टी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, इच्छुकांनी एकत्र येत एकमताने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता फक्त राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा होणे केवळ औपचारिकता राहिली आहे. (Latest Marathi News)
पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचे नाव जाहीर झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा कोणाला जाणार याचा तिढा सुटलेला नाही. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा जोर असल्याने आणि त्यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने बहुजन कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगू लागली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उमेदवारीसाठी बहुजन विकास आघाडी मधून ६ नावे चर्चेत होती. त्यामध्ये माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री मनीषा निमकर, वाडा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बुकले , जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव, बोईसरचे आमदार राजेश पाटील व पांडुरंग गोवारी यांची नावे होती. या सर्वांनी एकत्र येत चर्चा केल्यावर एकमताने राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. तशी शिफारस हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली असल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना संगितले.
हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि बहुजन विकास आघाडीने मला खूप काही दिले आहे. आता तरुणांना संधी द्यावी म्हणून मी आणि इतरांनी राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याचे जाधव यांनी सांगितले. इच्छुकांनी एकमताने राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली असली तरी उमेदवारांची घोषणा हितेंद्र ठाकूर उद्या करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या घरातूनच त्यांना राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे आजोबा हिराजी पाटील हे वसई पंचायत समितीचे उपसभापती राहिले होते, तर राजेश पाटील यांनी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषद सदस्य, वसई पंचायत समिती सभापती व आता बोईसरचे आमदार, असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.