Shivsena News : शिंदे गट ठाकरे गटाच्या एक पाऊल मागेच, जाहीरनामा प्रसिद्ध केलाच नाही

Eknath Shinde Group : काँग्रेसने सर्व प्रथम आपला जाहीरनामा सहा एप्रिलला प्रसिद्ध केला होता. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Uddhav Thackeray, Eknath
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच जागांवरील मतदान पार पडलेले असेल. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसोबत प्रादेशिक पक्षांनी देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ठाकरे गटाकडून वचननामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असताना शिंदे गट Shivsena Shinde Group मात्र यापासून अलिप्त राहिलेला दिसून येतो. याबाबतीत ठाकरे गट शिंदे गटाच्या एक पाऊल पुढे आहे.

Uddhav Thackeray, Eknath
Jalna Loksabha Constituency : 'दोस्त दोस्त ना रहा...' अब्दुल सत्तारांनी दानवेंना चकवा दिल्याची चर्चा !

काँग्रेसने Congress सर्व प्रथम आपला जाहीरनामा सहा एप्रिलला प्रसिद्ध केला होता. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवर प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. महाराष्ट्रात शरद पवार गटाकडून देखील जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर अजित पवार गटाने Ajit Pawar Group देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

ठाकरेंचा वचननामा

ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आली आहे. खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणार, केंद्रात सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून अधिक वाढविण्यासाठी आग्रही राहणार, अशी आश्वासने ठाकरे गटाने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाचा जाहीरनामा नाहीच?

शिवसेना (शिंदे गट) या टप्प्यातील सहा जागांवर लढत आहे. त्यामध्ये मुंबईतील तीन, ठाणे, कल्याण, नाशिक मतदारसंघातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहे. 18 मेला प्रचाराचा तोफा थंडावतील. त्यानंतर 20 मेला मतदान होईल. त्यामुळे मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शिंदे गट बिना जाहीरनाम्याचीच ही निवडणूक लढत असल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray, Eknath
Praful Patel News : प्रफुल पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम नाहीतर संभाजी ब्रिगेड देणार दणका...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com