लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) action मोडमध्ये असून जागावाटपासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाव्यात, यासाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस आग्रही आहे. असे असली तरी भाजपच्याविरोधात कसे लढायचे आहे, याची चर्चा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी केल्याचे समजते.
लोकसभा (Loksabha Election) निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला आहे. जागावाटपाचेही ठरले असून त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी भाजपविरोधात लढण्याचे ध्येय महत्त्वाचे आहे, यावर उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.
काही दिवसांतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) दिल्ली दौरा करणार आहेत. काँग्रेस 22 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात सर्वाधिक जागांसाठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे आता ठाकरे गट किती जागांसाठी आग्रही असणार आहे, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) किती जागा दिल्या जातील, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) आणि देशात 'इंडिया' (INDIA) आघाडीचा लढा भाजपविरोधात (BJP) आहे. त्यामुळे काहीही झाले तरी 'भाजपच्याविरोधात लढायचं' हा नारा घेऊन येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी आणि 'इंडिया' आघाडी एकत्रित लढणार आहे. त्यामुळे जागावाटपाचा विषय महत्त्वाचा असला तरी भाजपला हरवण्याचे ध्येय अंतिम असणार, यात शंका नाही, यावर ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.