Maharashtra Politics : निष्ठावंत शिवसैनिकाचे एकनाथ शिंदेंना चॅलेंज : गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही मरणार नाही

शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे घराण्याशी निष्ठावंत असलेल्या राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये सध्या असंतोषाची लाट आहे.
Shiv Sainik's challenge to Eknath Shinde
Shiv Sainik's challenge to Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sainik's challenge to Eknath Shinde : शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे घराण्याशी निष्ठावंत असलेल्या राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये सध्या असंतोषाची लाट आहे. आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरातून निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत 'मी खंबीर आहे, तुम्ही खचू नका, हिंमत सोडू नका, आपण शेवटपर्यंत लढू आणि विजय खेचून आणू, असा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले गेले आहे. असे असतानाच ठाकरे घराण्याशी निष्ठावंत असलेल्या एका जुन्या शिवसैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलं आहे. या शिवसैनिकाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Loyalist Shiv Sainik's challenge to Eknath Shinde: We will not die until we bury the traitors)

वाचा काय म्हटलं आहे या शिवसैनिकाने

थॅंक्यू मिस्टर शिंदे, तुम्ही माझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवले!

इतर अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. तेव्हा गावात शिवसेनेचं जवळपास कुणीच नव्हतं.मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची जिथून जमेल तिथून ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.

Shiv Sainik's challenge to Eknath Shinde
Raj Thackeray म्हणाले, "बाळासाहेबांची माझं ते भाषण ऐकलं अन् सांगितलं..मैदानाची भाषा.."

अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.

पण काय आहे मिस्टर शिंदे, तुमच्या सारखे लोक जेव्हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर व बाळासाहेबांच्या आशिर्वादाने निवडून आले ना, सगळ्या बाजूंनी सगळं मिळाल्यानंतर चटक लागली. शिवसैनिक तसाच आहे. फाटकाच. त्याचं आम्हाला काही वाटत नाही.

आता तुम्ही जे काही केलंय ती गद्दारीच. तुम्ही पहिले नाही आणि शेवटचे ही नसणार.पण तुम्ही जे केलंय ते आजपर्यंत कुणी नाही केलं. तुम्ही आमच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलाय. आमची शिवसेना दिल्लीच्या ठगांच्या मदतीने चक्क चोरलीत.

एक लक्षात ठेवा मिस्टर शिंदे,

ज्यांना शिवसेना, ठाकरे, मातोश्रीचा अडथळा वाटतो. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन होताना मुंबई हातची गेली असा ज्यांचा समज आहे, त्यांची सोबत घेऊन शिवसेनेवर ताबा मिळवताय. नांव मिळालंय, चिन्ह ही मिळालंय. मिळाली नाही आणि मिळणार ही नाही, ती आमची निष्ठा आणि मातोश्री वर असलेली श्रध्दा. कारण प्रत्येक सच्चा शिवसैनिक मानतो की, आजही आमचं दैवत त्या वास्तूत वावरतंय.

थॅंक्यू यासाठी म्हटलं मिस्टर शिंदे, की स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर प्रश्न पडला होता काय करायचं? तो प्रश्न सोडवलात तुम्ही. चक्क आयुष्य वाढवलंत माझं. किमान 15 वर्षांनी. आता लवकर मरायचं नाहीय व मरणारही नाही.

Shiv Sainik's challenge to Eknath Shinde
Ambegaon News : आंबेगावात आता विकासासाठी डबल इंजिन : वळसे पाटलांच्या कोटीला आढळरावांची हसून दाद

गद्दारांना गाडल्या शिवाय वर गेलो तर बाळासाहेब लाथ मारून खाली हाकलतील. ऊध्दवला,आदित्य ला सांभाळा सांगितलं होतं. तू असाच वर आलास. माफ नाही करणार ना बाळासाहेब. सगळं परवडेल, पण मोठ्या साहेबांची नाराजी कशी परवडेल?

तेव्हा, आता फीट रहायचं आणि तुमच्यासह सा-या गद्दारांना राजकीय पटलावरून दूर करीपर्यंत उसंत नाही घ्यायची. थॅंक्यू वन्स अगेन मिस्टर शिंदे. भेटूच निवडणूकीच्या आखाड्यात. आमच्याशी एकट्याने लढायची हिंमत नाहीय तुमची. दिल्ली वरून फौजा बोलवा. तीच तुमची खरी ताकद.

थॅंक्यू... तुम्हाला जय महाराष्ट्र नाही म्हणणार. तो मान गमावलाय तुम्ही.

- एक जेष्ठ शिवसैनिक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com