Ambegaon News : आंबेगावात आता विकासासाठी डबल इंजिन : वळसे पाटलांच्या कोटीला आढळरावांची हसून दाद

गेली दीड-दोन वर्ष सार्वजनिक कार्यक्रमात ते एकमेकांना सन्मानपूर्वक वागणूक देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. पुणे) : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे एकेकाळचे जिवलग मित्र. पण, मध्यंतरी दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले होते. पण, गेली दीड-दोन वर्ष सार्वजनिक कार्यक्रमात ते एकमेकांना सन्मानपूर्वक वागणूक देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंचर येथे शनिवारी महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते पुन्हा दिसून आले. (Double engine inside for the development of Ambegaon : walse Patil)

मंचर शहराच्या विकासासाठी यापूर्वीही निधी दिला आहे, यापुढे दिला जाईल. जी कामे शिल्लक आहेत, ती सर्व कामे मार्गी लावली जातील. आता तर डबल इंजिन आहे. माझे एक व शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक, असे म्हणत वळसे पाटील यांनी आढळराव पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यांच्या ह्या वक्तव्याला आढळराव पाटील यांनी मनमुराद हसून तर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

मंचर येथील कार्यक्रमात वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र आले होते. त्यावेळी हा संवाद झाला. या वेळी मीराबाई बाणखेले, सतीश बाणखेले, कल्पेश बाणखेले, धनेश बाणखेले, सरूबाई भगवंतराव दैने, शशिकांत बढे उपस्थित होते.

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
MAHA CONCLAVE : सहकार विद्यापीठ स्थापन करणार : अमित शहा

वळसे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे १०० बेडचे सरकारी हॉस्पिटलचे काम, पोलिस ठाणे इमारत व निवास तसेच, अवसरी खुर्द येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात प्रशस्त नाट्यगृह इमारतीचे बांधकाम सुरू आहे. डबल इंजिनमुळे कामे वेगाने होतील. मंचर परिसर व आजूबाजूच्या गावांना मिळणाऱ्या निधींचा फायदा होईल.

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
MAHA CONCLAVE : नवी सहकार नीती बनविण्यासाठी सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली समिती : अमित शहांची घोषणा

मंचर शहराच्या विकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. तपनेश्वर मंदिराच्या आवारात अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. देवस्थानाला क वर्ग मिळवून देण्यासाठी पाठपुरवा केला जाईल. (स्व) अरुण बाणखेले आणि ( स्व) भगवान दैने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबीयांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com