Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार; 'महापत्रकारपरिषदे'आधी 'मातोश्री'वर तातडीची बैठक

Maha Patrakar Parishad Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची महापत्रकारपरिषद मुंबईत आज पार पडणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच लागला. हा निकाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयातदेखील धाव घेतली आहे.

यानंतर आता ठाकरे गटाने 'लढाई जनतेच्या कोर्टात' अशी भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी दुपारी 4 वाजता महापत्रकारपरिषद होणार आहे. या पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. याबरोबरच या पत्रकारपरिषदेला 'जनता न्यायालय' असं नाव देण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Ncp Mla Disqualification : अजित पवार गटाच्या आमदारांचा 'मेरा जवाब'

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत. तसेच नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयात जे मांडण्यात आले, त्या मुद्यांवर ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या महापत्रकारपरिषदेआधी ठाकरे गटाकडून टीझर रिलीज करण्यात आला आहे.

आता जनताच न्याय करेल, जनतेपुढे सगळा सोक्षमोक्ष लागेल, या अर्थाने ही पत्रकार परिषद घेण्यात येत असून पक्ष चोरायचा प्रयत्न झाला. पण आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. त्यामुळे कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. सत्य लपून राहणार नाही, आमची बाजू सत्याची आहे आणि संविधानाची आहे, असा उल्लेख या टीझरमध्ये करण्यात आला आहे.

'मातोश्री'वर तातडीची बैठक

उद्धव ठाकरे आज महापत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकारपरिषदेत ते राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर भाष्य करणार आहेत. 2018 च्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही आणि म्हणून शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला.

आता या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे हे सर्व कागदपत्रांसह भाष्य करणार आहेत. मात्र, या पत्रकारपरिषदेआधी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, तसेच ठाकरे गटाचे वकील यांच्यात एक तातडीची बैठक पार पडली आहे.

या बैठकीत आजच्या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती कागदपत्रे सादर केली जाणार, कोणत्या मुद्यांवर बोलायचं? यासह आदी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आजच्या पत्रकारपरिषदेत शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Uddhav Thackeray
Madha Loksabha : फडणवीसांच्या दौऱ्यात दिसणार रामराजे - रणजितसिंह यांची युती ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com