Madha Loksabha : फडणवीसांच्या दौऱ्यात दिसणार रामराजे - रणजितसिंह यांची युती ?

Inauguration program in Phaltan taluka : फलटण तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम.
Devendra Fadnavis, Ramraje Naik - Nimbalkar, Ranjitsinh Naik -Nimbalkar
Devendra Fadnavis, Ramraje Naik - Nimbalkar, Ranjitsinh Naik -NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Madha Loksabha : सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात सातारा, माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निश्चय करण्यात आला होता. त्यामुळे साताऱ्यासह माढामध्ये महायुती तयारीला लागली असल्याचे चित्र आहे. त्याला घटकपक्षांनीही साथ देणार असल्याचे सांगितले आहे.

तर माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आगामी लोकसभेसाठी महायुतीकडे इच्छा व्यक्त करीत तशी तयारीही सुरू केली आहे. ते माढा लोकसभासाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी उद्या बुधवारी (दि. 17 जानेवारी) फलटण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजिला आहे.

Devendra Fadnavis, Ramraje Naik - Nimbalkar, Ranjitsinh Naik -Nimbalkar
Hatkanangale LokSabha Constituency : आघाडी-युतीला बाजूला सारून राजू शेट्टींचा सवतासुभा मतदारांना भावणार ?

त्यामुळे फडणवीस उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी रामराजे आणि रणजितसिंह यांच्यात आतापर्यंत संघर्ष पाहावयास मिळाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील कार्यक्रमाला रामराजे उपस्थित राहणार काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून, सातारा, माढा मतदारसंघात याचीच चर्चा रंगली आहे.

माढाचे खासदार रणजितसिंह यांनी आगामी लोकसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी होत आहे. फलटण येथे होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी रणजितसिंहांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, शंभूराज देसाई यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन होणार असून, कार्यक्रम शासकीय असल्याने प्रोटोकॉलनुसार रामराजे यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, फलटण तालुक्यात रामराजे गट आणि खासदार गटात अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. 'पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. माढाचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल, वाड्याबाहेरचा होणार नाही,' असे मत मागील वर्षी रामराजे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार गटाचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर सर्व चित्र पालटून गेले.

तर ‘इलेक्शन आलं की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सरपंच होण्याची इच्छा असते. त्यामुळे इच्छा व्यक्त करण्यात काही गैर नाही,’ असा टोला काही दिवसांपूर्वी रणजितसिंहांनी रामराजेंना लगावला होता. त्यामुळे या दोन्ही गटांतील संघर्ष पाहता रामराजे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार काय, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.

दरम्यान, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या फलटण येथील कार्यक्रमाला रामराजे यांनी उपस्थिती लावली होती, तर त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधून घेतले होते. आता भाजपचे उपमुख्यमंत्री फडणवीस फलटण येथे येणार असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील का नाही, याची चर्चा सध्या सुरू आहे.

Devendra Fadnavis, Ramraje Naik - Nimbalkar, Ranjitsinh Naik -Nimbalkar
Nagpur Congress : जिचकारांच्या आशीर्वाद यात्रेला सुनील केदारांचे पाठबळ

तालुक्याची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती : खासदार रणजितसिंह

उद्या बुधवारी फलटण येथे दुपारी 3 वाजता नीरा देवघरच्या कालवा कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. फलटण - बारामती रेल्वे मार्गामुळे आता दक्षिणेच्या गाड्या फलटणमार्गे जात आहेत.

नीरा देवघरसाठी दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या संघर्षामुळे या योजनेचे पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या दुष्काळी भागात जाणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. तसेच फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यामधील काळज येथे नीरा देवघर प्रकल्प, नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी प्रकल्प यासोबतच विविध योजनांचे लोकार्पण होणार आहे.

या माध्यमातून तालुक्यात आठवं आश्चर्य प्रत्यक्षात येत असून, या तालुक्याची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती होत आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही खासदार रणजितसिंह यांनी केले आहे.

R...

Devendra Fadnavis, Ramraje Naik - Nimbalkar, Ranjitsinh Naik -Nimbalkar
Lok Sabha Election 2024 : अकोल्यात आंदोलनाचे पीक; विरोधी पक्षांचे नेते आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com