पंकज रोडेकर-
Maharashtra Politics Latest News : नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे बॅनर ठाणे शहरातील चौका-चौकात पाहण्यास मिळत आहेत. ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शन या उड्डाणपुलासह शहरातील विविध भागांत महाविकास आघाडीकडून ठाणेकर नागरिकांना नवीन वर्षाच्या 'हटके' शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. महाविकास आघाडीने एक बॅनर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर लावत त्यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय या बॅनरवर काम, समर्पण आणि निष्ठा असे उल्लेख करीत मुख्यमंत्री शिंदे यांना चिमटा काढला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा ठाण्याकडे लागलेल्या आहेत. त्यातच लोकसभेचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना महाविकास आघाडीने येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. असे मोठ्या अक्षरात म्हटले आहे. शिवाय महाराष्ट्राचा नकाशाही आहे.
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना माझी ओळख असा उल्लेख करून काम, समर्पण आणि निष्ठा असे ठळक अक्षरात म्हटले आहे. या बॅनरवर लोकनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. महाविकास आघाडीने या बॅनरद्वारे कार्यकर्त्यांनाही सज्ज होऊन कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे. पण, हे बॅनर नेमके कोणी लावले आहे? ते समजू शकले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाणे शहरात गेल्या वर्षात राजकीय बॅनरवॉर पाहण्यास मिळाले होते. आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या महाविकास आघाडीच्या लावलेल्या हटके बॅनरमुळे 2024 मध्येही बॅनरवॉर पाहण्यास दिसणार, अशी शक्यता आहे. या बॅनरला आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेमके कशा प्रकारे उत्तर देतात? याकडे लक्ष आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.