Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदेंनी धाडली मानहानीची नोटीस, संजय राऊत म्हणतात, 'अब आयेगा मजा...!'

CM Eknath Shinde News: तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. तसेच तुमच्यासह सामना विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, अशी नोटीस राऊतांना देण्यात आली आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde Vs Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. रविवार (26 मे) रोजी शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत (Eknath Shinde) खळबळजनक दावा केला होता. राऊतांनी लिहिलेल्या लेखावर आक्षेप घेत आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

तसंच तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. तसेच तुमच्यासह सामना विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, अशी नोटीस राऊतांना (Sanjay Raut) देण्यात आली आहे. तर राऊतांनी ही नोटीस येताच मुख्यमंत्र्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या नोटीसचा फोटो शेअर केला आहे. तर या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, "50 खोके एकदम ओके। इसे कहते है उल्टा चोर कोतवाल को डाटे, गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदेने हमे एक लीगल नोटीस भेजी है. अब आयेगा मजा!!!"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut, Eknath Shinde
Pune Hit And Run Case: नाना पटोलेंचे बोट कुठल्या आमदाराच्या दिशेने?

राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर नेमका काय आरोप केला होता?

सामनामध्ये राऊतांनी लिहिलं होतं, "महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत (Election) पैशांच्या धुरळय़ावर चालला. लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले. त्याचे आज कुणालाच काही वाटेनासे झाले. मोदी-शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध:पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही व किमान 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव होईल. महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी-फडणवीस-शिंदे उडून गेले.

अमित शहांची (Amit Shaha) दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोय. मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे. 2019 ची निवडणूक ‘पुलवामा’ हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली. 2024 ची निवडणूक मोदी-शहा त्याच जवानांचे शाप-तळतळाट यामुळे हरत आहेत. जवानांचे आत्मे भटकतच होते. 4 जूनला त्यांना मोक्षप्राप्ती होईल."

Sanjay Raut, Eknath Shinde
India Alliance : काँग्रेससोबत ना लव्ह मॅरेज, ना अरेंज मॅरेज! निकालाआधीच केजरीवालांनी वाढवलं ‘इंडिया’चं टेन्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com